Cotton Market : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज अपडेट झालेल्या बाजार समिती मध्ये कापसाच्या भावात ७० ते ८० प्रति क्विंटल रुपयांनी कापसाचे भाव वाढले आहेत. या बाजार समिती मध्ये ८ हजार पेक्षा जास्त भाव मिळाला आहे.
आजचे कापसाचे भाव | Cotton Rate | Cotton Market
राळेगाव कापसाचे भाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न समिती राळेगाव मध्ये आज कापसाचे कमीत कमी ७ हजार ९०० तर जास्तीत जास्त ८ हजार २३० आणि सरासर ८ हजार १५० प्रति क्विंटल भाव मिळत आहे.
मागच्या आठवड्यातील शनिवारी या राळेगाव बाजार समिती मध्ये कमालीचा दर ८ हजार १८५ प्रति क्विंटल दर मिळाला होता. पण या आठवड्यातील पहिल्या दिवशी ४५ रुपयांनी कापसाच्या भावात वाढ झालेली आहे.
आज राळेगाव बाजार समिती मध्ये जवळपास ४ हजार क्विंटलची आवक पोहचली आहे.
👇👇👇👀
कापसाचे भाव २७५ रुपायांनी वाढले
देउळगाव राजा कापसाचे भाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती देउळगाव राजा मध्ये आज येथे कमीत कमी ७ हजार ४०० तर जास्तीत जास्त ८ हजार २०० आणि सरासर ८ हजाार ००५ प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
या बाजार समिती मागील शनिवारी ११ फेब्रुवारी कमालीचा दर ८ हजार १३० प्रति क्विंटल भाव होता तर आज या आठवड्यात ७० रुपयांनी कापसाच्या भावात वाढ झाली आहे.
देउळगाव राजा बाजार समिती मध्ये लोकल ६०० क्विंटल पोहचली आहे.
वरोरा माढेली कापसाचे भाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा माढेली येथे कमीत कमी ७ हजार ४०० तर जास्तीत जास्त ८ हजार १५० तसेच सरासर ७ हजार ८५० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
मागील आठवड्यात शनिवारी ११ फेब्रुवारी कमालीचा ८ हजार १५० दर होता तर या आठवड्यात पहिल्याच दिवशी ५० रुपयांनी वाढ झालेली आहे.
वरोरा माढेली बाजार समिती मध्ये आज लोकल आवक ३०४ क्विंटल आलेली आहे.