Agriculture News : कापसाला शेतकऱ्यांच पांढर सोन म्हणून ओळखल जात. पण या पांढऱ्या सोन्याचे भाव हे सतत घसरत होते. त्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या आधीच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच कापसाला कवडी मोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी कापूस विकण्यास तयार होत नाही.
या आठड्यात कापसाचे भाव वाढणार | Cotton Market
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागील आठवड्यात कापसाच्यात भावात वाढ झाले आहे. अनेक बाजार समिती मध्ये कापसाचे भाव हे कमी असले तरी कापसाच्या भावात या आठवड्यात तेजी येण्याची शक्यता जास्त आहे. आंतरराष्ट्री बाजारपेठेत भारतीय कापसाला मागणी सुरु झाली आहे. खास करुन चीन मध्ये कापसाचा वापर वाढला त्यामुळे चीनकडून सुध्दा कापसाची मागणी वाढली म्हणून कापसाचे भाव वाढणार.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ८३.२१ सेंट रुपायात सांगायचे झाले तर १५ हजार १६० तसेच उच्चांकी भाव ८६.७२ सेंट रुपायात सांगायचे तर १५ हजार ७८८ पर्यंत मंगळवारी मिळाला होता. शक्रवारी ८५.३४ सेंट म्हणजेच १५ हजार ५३७ भाव मिळाला आहे. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १०० रुपायांनी वाढ झालेली पाहयला मिळाली आहे.
सरकीचे भाव ३ हजार ७०० तसेच ६२ हजार पर्यंत खंडीचे भाव गेल्या होते. चीन मध्ये आता परिस्थिती सुधारली आहे त्यामुळे तेथील व्यापार सुरळीत चालू झाले आहेत. त्यामुळे चीनसह इतर देश सुध्दा भारतातील कापसाची आयात करण्यास सुरुवात केली आहे. कापूस बाजारातील अभ्यासकांनी दिलेल्या माहिती नुसार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तसेच इतर देशातून आयातीची सुरुवात आणि १३ फेब्रवारीला कापसाचे वायदे सुरु होणार असल्यामुळे कापसाच्या भावात ( Cotton Rate ) आपणास सुधारणा झालेली पाहयला मिळेल.
👀👇👇👇👀