कापसाचे भाव : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कापसाचे भाव पाहणार आहोत. आज कापसाचे भाव कशा प्रकारे वाढत आहे. तसेच कापूस केव्हा विकावा या बाबतीत या लेख मध्ये पाहणार आहोत.
kapus bajar bhav |
कापसाचे भाव वाढले
महाराष्ट्रात कापसाचे भाव 10 हजार पेक्षा जास्त भाव भेटत आहे. काही ठिकाणी तर 11 हजार पर्यंत भाव गेले आहे. कापसाचे भाव का वाढत आहे? हे आधी समजून घ्या. भारतात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी गारपीट झाली आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भारतात कापसाची कमतरता निर्माण झाली आहे. व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढली आहे. यामुळे कापसाचे भाव वाढत आहे.
आजचे कापसाचे भाव
किनवट, राळेगाव, अमरावती, हिंगोली, सेलु, आष्टी कारंजा, वडवणी, हिंगणा, आष्टी वर्धा, पारशिवनी, कळमेश्वर, मनवत, काटोल, सिंदी सेलू, वर्धा, चिमुर या सर्व बाजार समिती मध्ये कापसाचे भाव 10 हजार पेक्षा जास्त भाव कापसाला भेटला आहे.
कापूस केव्हा विकावा
शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कापूस असेल तर कापूस केव्हा विकावा हा प्रश्न नक्कीच पडला असेल. काही तज्ञांनी याबाबत माहिती सांगितली आहे. तेच तुम्हाला आता सांगणार आहे. महाराष्ट्रात युपी बिहार गुजरात मध्ये जास्त कापसाची लागवड केली जाते.
या ठिकाणी सर्वात जास्त अतिवृष्टी गारपीट झाली आहे. पण तेथील व्यापारी महाराष्ट्रात येऊन कापूस घेऊन जातात. त्यामुळे कापसाच्या भावात तेजी येत आहे. आता कापूस अंतिम टप्प्यात आहे.
तरी शेतकऱ्यांनी निम्मा कापूस विकावा तसेच तुम्हाला अस वाटत असल की आपल्या कापसाला 11 हजार हा भाव भेटावा.
आपणास आम्ही ऐवढच सांगू इच्छितो की कापसाचे भाव किती वाढतील हे सांगता येणार नाही पण कापसाचे भाव स्थिर राहतील तसेच कापसाचे भाव कमी होईल याची शक्यता कमी आहे.
हा सर्व वरील बाजार भाव 4/02/2022 चा आहे