Onions Subsidy : महाराष्ट्रातील कांद्याचे भाव हे सतत दिवसांन दिवस घसरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये तसेच विधानसभेत सुध्दा कांद्याच्या भावावर चर्चा होत आहे. कांद्याची शेती करायला शेतकऱ्यांना परवडत नाही. तसेच मागील वर्षापासून खते बियाणे औषधे महाग होत आहे. सध्याच्या परिस्थितीत कांद्याच्या भावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. खर्च हि निघत नसल्याने शेतकरी आता रस्तावर कांदा फेकत आहे.
Onions Subsidy |
कांद्या हा विषय महाराष्ट्रात चांगलाच गाजला होता त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे ठरवले आहे. लवकरच शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान कसे मिळेल तसेच किती येणार अनुदान ? या बाबत आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
राज्यात शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. पण कांद्याच्या भावात सुधारणा होत नसल्याने शेतकऱ्यांनी आनंदोलनाची सुरुवात केली होती. अनेक शेतकऱ्यांनी कांदा हा रस्त्यावर फेकून सरकारचा निषध सुध्दा केला आहे.
कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक होतील यामुळे सरकार आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे ठरवत आहे. सध्या महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या अशी मागणी व यावरती चर्चा सुध्दा वाढली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी एक समितीची तयार केली आहे. हि समिती मध्ये कांद्याच्या भावावरती अभ्यास करणार आणि येत्या उर्वरित ५ दिवसात अहवाल सादर करणार आहे.
जांणकरांच्या मते कांद्याला किती अनुदान येणार ?
जांणकरांच्या मते, नेमवली समिती कांद्याचे भाव का कमी झाले ? आतापर्यंत कांद्याची आवक किती पोहचली आहे? इतर राज्यात कांद्याला भाव कश्याप्रकारे मिळत आहे ? अश्या प्रकारे अभ्यास करणार आहे. पण शेतकऱ्यांच्या मते तसेच जांणकरांच्या मते, प्रति क्विंटल मागे ३०० ते ५०० रुपये अनुदान मिळण्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे. येत्या दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांना अनुदान बाबत आनंदाची बातमी मिळू शकते.