Cotton Market : भारतात जवळपास कापसाची गरज ३२० लाख गाठीची सांगण्यात येत आहे. पण यावर्षी शेतकऱ्यांनकडे अंदाजे ३२५ ते ३३० लाख गाठी असू शकतात असे जांणकरांच मते आहे.
शेतीसाठी लागणारे औषधे तसेच औजारे यावर्षी महाग झाले आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसाची शेती करायला यावर्षी फायदेशीर ठरली नाही. मागील वर्षी १५ हजार कापसाला भाव मिळाला तर यावर्षी कमीत कमी १० हजार तरी कापसाला भाव मिळाला पाहिजे अशी इच्छा शेतकऱ्यांची आहे.
मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी कापसाला तूफान भाव मिळेल कापसाच्या उत्पादनात खुप कमी आली आहे. असा अंदाज जांणकार लोकाकून तसेच बातम्या मोठ्या प्रमाणास सुरुवातीपासून पसरत होत्या. मध्यंतरी कापसाला भाव ९००० प्रति क्विंटल भाव मिळाला होता. पण शेतकऱ्यांना १० हजार पेक्षा कमी भाव नको. देशात कापसाची कमतरता आहेच पण अनेक कंपन्याकडून कापसाची सुध्दा मागणी वाढली आहे. तरीही कापसाला भाव मिळत नाही नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नवीन डावावर अमंल बजावणी करत आहे. मुख्य म्हणजे देशात कापसाची मागणी तसेच गरज सुध्दा आहे. जो पर्यंत कापसाला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत कापसाची विक्री करणार नाही.
शेतकरी कापूस विक्री का करत आहे ?
अनेक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कापूस रोखून ठेवला आहे. शेतकऱ्यांनी कापसाची साठवण घरातच केल्यामुळे त्यापासून त्वचारोग निर्माण होत आहे. शरीराव लहान लहान लहान फोड शरीरावर येतात तसेच शरीरावर अनेक ठिकाणी खाजू मोठ्या प्रमाणात सुध्दा येतात. या आजारामुळे काही शेतकरी कापसाची विक्री करत आहे. तसेच कापूस इतक्या दिवसापासून घरातच ठेवला पण कापसाच्या भावात सुधारणा झालीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना निराशा हातात येत असल्यामुळे आणि धीर सुध्दा सुटत असल्यामुळे शेतकरी कापूस विकत आहे.
कापसाचे भाव कोण वाढू देत नाही ?
जगात कापसाची मागणी मोठी तसेच कापसाचे उत्पादन सुध्दा प्रमाणात तरीही कापसाचे भाव वाढत नाही ! मिळालेल्या माहिती नुसार, शेतकऱ्यांना अति नफा मिळू नये तसेच आपल्याला नफा ऐवजी तोटा मिळू नये यासाठी देशात बाजारातील व्यापार मंद गतीने चालू ठेवले आहे.
शेवटी शेतकऱ्यांना कमी भावातच कापसाची विक्री करावी लागणार ?
यावर्षी १ क्विंटल मागे जवळपास ३० टक्कांनी खर्च वाढला आहे. म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना १ क्विंटलचा खर्च ५ हजार इतका आला आहे. अनेक राज्यात शेतकरी कापसाची लागवड करतात. खास करुन तेलंगणा आणि महाराष्ट्रातील अनेक भागात कापसाचे पीक घेतले जाते. पुढे शेती करण्यासाठी किंवा शेतकरी आणखीन किती दिवस कापूस घरात ठेवणार ? शेवटी शेतकऱ्यांना कापूस विकावा लागणार आहे.