जातीचा दाखला नसेल तर रेशन कार्ड नाही

जातीचा दाखला नसेल तर रेशन कार्ड नाही 

cast certificate Necessary for Ration card
cast certificate Necessary for Ration card 


रेशन कार्ड 2021

आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. तुमच्याकडे जातीचा दाखला नसेल तर तुम्हाला रेशन कार्ड भेटणार नाही. आता नवीन नियम समोर आला आहे. या नियमामुळे गोर – गरीब तसेच सर्व सामान्य लोकांच्या डोक्याला ताप होणार आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांना सुध्दा सरकारी दरबारात हेलपाटे मारवे लागणार आहे. 

जातीचा दाखला नसेल तर रेशन कार्ड नाही

धुळे : कुपन म्हणजे सर्व सामान्य माणसाला आधार देणार होय. रेशन हे सर्व सामान्य लोकांना स्वस्त दरात धान्य देत आहे. हे आपणास माहिती आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे अनुसूचित जाती – जमातीच्या लोकांना योग्य दरात पुरेसे धान्य भेटावा हा सरकारचा हेतू होता. रेशन कार्ड मिळवण्यासाठी सरकारने जो नियम काढला आहे. त्यामुळे दलित समाजातील लोकांना नवीनच ताप झाला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम (NFSA) 2013 यानुसार नवीन रेशन कार्ड बनवताना किंवा दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला जात प्रमाण पत्र सादर करावे लागणार आहे. त्यामुळेच जातीचा दाखला नसेल तर रेशन कार्ड नाही. 2 जून 2021 च्या आदेशानुसार रेशन धान्य वाटपासाठीच्या साॅफ्टवेअर मध्ये जातीचा रकांना देण्यात आला आहे. हा रकांना भरल्या शिवाय अर्जदाराचा रेशन कार्डचा अर्ज मान्य केला जात नाही. त्यामुळे गोर – गरीब तसेच दलित समाजातील लोकांना सरकार दरबारी हेलपाटे मारवे लागणार आहे. 

रेशन कार्ड  

रेशन कार्ड मुळे कित्येक लोकांच्या समस्या मिटतात. तसेच ज्या लोकांकडे पोट भरण्यासाठी काही नसते शेवटी त्या लोकांना रेशन कार्डचा आधार असतो. पण आता तुमच्या कडे जातीचा दाखला नसेल तर लवकरच जातीचा दाखला काढण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्याकडे जातीचा दाखला नसेल तर तुम्हाला रेशन कार्ड भेटणार नाही. स्वस्त धान्याचा लाभ तुम्ही घेऊ शकत नाही. आता हा नवीन नियम समोर आल्याने बरेच लोक या बाबतीत प्रश्न विचारतात. रेशन कार्ड साठी जातीचा दाखला कशासाठी लागतो. असे नियम लावणे म्हणजे गरीबांच्या पोटावर पाय दिल्यासारखे आहे. या पाठीमागे सरकारचा उद्देश काय आहे हे सरकारने सांगावे. तसेच सरकारी कार्यालयात गोर – गरीबांना हेलपाटे मारव्या लागणार आहे. पण जातीच प्रमाण पत्र भेटणार केव्हा तसेच रेशन कार्ड मिळणार कधी? असे गोर – गरीबांना प्रश्न पडले आहे. 

Leave a Comment