जानेवारी (2022) महिन्यात कापसाचे भाव वाढणार

जानेवारी (2022) महिन्यात कापसाचे भाव वाढणार |

kapus bajar bhav today 2022
kapus bajar bhav today 2022

आज आपण कापसाचे भाव वाढणार आहे की नाही या बाबत पाहणार आहोत. जानेवारी 2022 मध्ये कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. कापसाचे तब्बल 10 हजार भाव पर्यंत जातील. कारण 31 डिसेंबर 2021 दिवशी काही ठिकाणी 9000 हजार पेक्षा जास्त भाव भेटला आहे. 

जानेवारी 2022 महिन्यात

शेतकरी मित्रांनो डिसेंबर 2021 महिन्यात कापसाच्या भावात चढ उतार झाले आहेत. डिसेंबर महिन्यात बऱ्याच दिवस 8000 हजार हा कापसाला भाव होता पण आता कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. अमरावती येथे 9300 असा भाव चांगल्या कापसाला भाव मिळाला आहे. बऱ्याच जिल्ह्यात कापसाचे भाव वाढले आहेत. अमरावती, हिंगोली, सेलु, पारशिवनी, जामनेर, अकोला बोरगावमंजू, मनवत, देऊळगाव राजा, वरोरा-शेगाव, पुलगाव या सर्व बाजार समिती मध्ये 9000 हजार पेक्षा जास्त भाव मिळाला आहे. चांगल्या प्रकारच्या कापसाला भाव 9000 ते 9550 पर्यंत भाव मिळाला आहे. कमीत कमी कापसाला भाव 8100 ते 8800 पर्यंत भाव मिळाला आहे. ज्या प्रकारे कापसाचे भाव वाढत आहे. त्याच प्रमाणे कापसाची आवक कमी दिसत आहे. 

कापसाचे भाव वाढणार

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान पण झाले आहे. कापसाचे मोठ्या प्रमाणात पिक महाराष्ट्रात घेतले जाते. अतिवृष्टी ढगफुटी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामुळे कापसाची आवक कमी झाली आहे. आवक कमी असल्याने भाव वाढत आहे. गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यात पण अतिवृष्टी झाली आहे. या राज्यात सुध्दा कापूस कमी आहे. गुजरात, उत्तर प्रदेश राज्यातील व्यापारी महाराष्ट्रात येत आहेत. बाकी राज्यात सुध्दा कापूस कमी असल्याने महाराष्ट्रातील कापसाला चांगल्याप्रकारे भाव भेटत आता हे आणखीन भाव वाढण्याची शक्यता आहे. “Cotton rate in Maharashtra 2022”

Leave a Comment