महाराष्ट्रातील तज्ज्ञांच्या मते, यावर्षी कापूस उत्पादकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून कापसाला चांगल्याप्रकारे भाव मिळेल असा अंदाज वर्तवला होता. आताची परिस्थिती पाहता कापसाचे भाव हे गडगडले आहेत.
भारतात ३६० लाख गाठी कापसाचे उत्पादन होईल असा अंदाज अगोदर तज्ज्ञांचा होता. त्यानंतर अंतिवृष्टी झाली, पुन्हा तज्ज्ञांनी अंदाज जारी करत म्हटले की यावर्षी अतिवृष्टी झालेली असल्यामुळे भारतात ३४० लाख गाठीचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. व कापसाचे भाव हे स्थिर राहतील.
सत्य परिस्थितीती पाहता, भारतात फेब्रुवारी महिन्यात १४५ लाख गाठीची आवक आली होती. तरीही अजून कापसाला चांगल्याप्रकारे भाव नसल्याने शेतकऱ्यांचा कापूस अजून घरातच पडून आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी असल्यामुळे काही शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कापूस विकून टाकला आहे.
तज्ज्ञांच्या मते, मार्च महिन्यात जवळपास १०० लाख गाठी बाजारात आल्याचा दावा केला जात आहे. आतापर्यंत २४५ लाख गाठी बाजारात पोहचल्या आहेत. तसेच २० टक्केहून कमी शेतकऱ्यांनकडे कापूस असल्याचा दावा केला जात आहे. एप्रिल महिन्यात शेवटपर्यंत ५० लाख गाठी बाजारात येण्याची शक्यता आहे.
कापसाचे भाव वाढत नसल्याने शेतकऱ्यांन मध्ये निराश निर्माण झालेली आहे. पण यावर्षी ३४० लाख गाठीचे उत्पादन होईल असा अंदाज सांगण्यात येत होता, पण खर पाहता तर हा तंज्ज्ञांचा अंदाज खोटा ठरताना दिसत आहे. बाजार समिती मध्ये कापसाची आवक हि कमी झाली असून ३०० लाख गाठी पर्यंतच आवक होण्याची शक्यता आहे. काही जांणकरांच्या मते ३०० लाख गाठी पुढे कापसाचे उत्पादन जाणार नाही.
कापसाचे भाव वाढणार का ?
कापसाचे भाव वाढतील या अशाने शेतकऱ्यांनी गेल्या दोन ते तीन महिन्यापासून कापूस घरातच साठवून ठेवला होता. कापसाच्या भावात सुधारणा होत नसल्याने शेतकऱ्यांन मध्ये धीर सुटला आणि जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी कापूस विकला आहे. उरलेले २० टक्के शेतकरी कापसाचे भाव वाढतील या अशाने शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला आहे. कृषी अभ्यासकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षी शेतकऱ्यांना कापसामुळे फायदा मिळाला होता पण यावर्षी फक्त व्यापऱ्यांनाचा फायदा होणार असे चित्र पाहयला मिळत आहे.