Onions Market : मागील कांद्याची आयात थांबल्याने तीन दिवसात १५ कोटीचे नुकसान झालेले समोर आले आहे. जर कांद्याला अजून मागणी नाही आली तर कांद्याच्या भावात आणखीन घसरण सुध्दा पाहयला मिळू शकते.
Onions Price |
तीन दिवसात १५ कोटीचे नुकसान | Onions Price | Onions Market
पाकिस्तान हा देश दुबई वरुन कांदा आयात करत होता. पाकिस्तान मध्ये सध्या आर्थिक अडचणी वाढल्या तसेच तेथील परिस्थिती चांगली नसल्याने कांदा दुबई वरुन आयात बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानच्या सरकारने घेतला आहे.
👇👇👇👀
दररोज कांद्याचे भाव पाहण्यासाठी
शेतकरी असाल तर शेतकरी मित्रांना आताच पाठवा
👆👆👆👀
दुबई भारतातून कांदा आयात करतो आणि पाकिस्तान दुबई वरुन कांदा आयात करत होता. पाकिस्ताने आयात बंद केल्यामुळे दुबई वरील व्यापारी कांदा आयात कमी करत आहे. याचा सारा परिणाम भारतातील बाजार समिती वर पाहयला मिळत आहे. नाशिक बाजार समिती मध्ये गेल्या तीन दिवसात १५ कोटीचे नुकसान झालेले समोर आले आहे. या बाजार समिती मध्ये सरासर प्रति क्विंटल २०० रुपयांची घसरण झाली असे सांगण्यात येत आहे.
कांद्याच्या भावात तूफान घसरण होणार
लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत या बाजार समिती मध्ये गेल्या मागील महिन्यात १ हजार ६०० प्रति क्विंटल भाव मिळत होता पण या महिन्यातील पहिल्याच दिवशी १ हजार २०० प्रति क्विंटलनी सुरुवात झाली होती. मागील ९ दिवसात कांद्याच्या दरात सतत घसरण पाहयला मिळत आहे.
तसेच अनेक भागातून नवीन कांद्याची आवक सुरु होणार आहे. दुबई, सिंगापूर, लंडन असे इतर देशातून कांद्याची मागणी येऊ शकते. सध्या परिस्थिती पाहता कांद्याच्या भावात चढ उतारच पाहयला मिळणार आहे.
👇👇👇👀
आजपासून पाकिस्तान दुबई वरुन कांद्याची आयात बंद करणार आहे. तसेच चीनचा नवीन कांदा बाजारात उतरला आहे. बांग्लादेश हा पश्चिम बंगाल मधून कांद्याची आयात करत आहे. गुजरात मधील नवीन कांदा बाजारात येत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याची निर्यात कमी झाल्या सारखी आहे.