नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने पैसे जमा होणार | 7 हजार 93 कोटीचा निधी मंजूर | Crop Insurance

Crop Insurance : विधानसभेत शेतकऱ्यांनसाठी सर्वात महत्वाची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. लवकरात लवकर शेतीचे पंचनामे व्हावे यासाठी सरकार आता तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यास विलंब होणार नाही.

Crop Insurance
Crop Insurance

महाराष्‍ट्रात विधानसभेत प्रथम अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प माडत असतांना, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी तातडीने निधी देणार अशी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांचे नैसर्गिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून ७ हजार ९३ कोटी निधी वितरीत होणार आहे. शेतीचे पंचनामे तातडीने झाले पाहिजे यासाठी सरकार मानवी हस्तक्षेप कमी करुन तंत्रज्ञानाचा आधार घेणार आहे. म्हणजेच मोबाईलव्दारे ई पंचनामे, सर्वेक्षणसाठी उपग्रह, ड्रोनचा आधार तसेच संगणकाचा वापर केला जाणार. अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी हि माहिती सांगितली आहे.

👇👇👇👀

1 लाख 92 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्रति महिन्याला पैसे मिळणार 

Leave a Comment