
पावसाचे थैमान : राज्यातील अनेक जिल्ह्यात भाग बदलत पाऊस झालेला आहे. अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसासह गारपीट सुध्दा झाली आहे. अहमदनगर मध्ये शेवगाव तालुक्यात भाग बदलत पाऊस झाला आहे. काही ठिकाणी गारपीट सुध्दा पाहण्यास मिळाली आहे.
पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यात आज रात्री पाऊस होणार आहे. अहमदनगर मध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची तसेच जनांवरांची काळजी घ्यावी.
आज रात्री पाऊस असणार का ?
वाशिम, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, बीड आज रात्री या जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील २ में पर्यंत या जिल्ह्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार असणार आहे.
