पीएम किसान : योजनेअंतर्गत 5000 हजार रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत फायदा घेत असाल तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आपण या लेख मध्ये पीएम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत 10 हप्ता केव्हा येणार आहे. या बाबत अपडेट पाहणार आहोत. तसेच पीएम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत 2000 हजार रुपये ऐवजी 5000 हजार रुपये मिळणार आहे का नाही या पाठीमागचे सत्य पाहणार आहोत.
5000 thousand under PM Kisan Yojana |
पीएम किसान : योजनेअंतर्गत
पाठीमागचे सत्य जाणून घ्याPM Kisan म्हणजे पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना आहे. तसेच ही योजना 1 डिसेंबर 2018 पासून सुरुवात झाली आहे. यात शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6000 हजार रुपये भेटतात. एकाच वर्षात तीन हप्ता मध्ये 2000 हजार रुपये दिले जातात. वर्षातून तीन हप्ते म्हणजे चार महिन्यातून एक हप्ता येतो. असे शेतकऱ्यांना 9 हप्ते दिले आहेत. मध्यंतरी 2000 हजार रुपये ऐवजी शेतकऱ्यांना 5000 हजार रुपये पीएम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत मिळणार आहे अशा बातम्या सोशल मीडियावर तसेच मेसेज द्वारे व्हायरल होत होत्या.
PMkisan.gov.in अधिकृत वेबसाइटवर भेट दिली. त्या ठिकाणी माहिती वाचल्यावर आम्हाला कळले की, तेथे स्पष्ट पणे सांगितले की, शेतकरी कुटुबांना प्रतिवर्षी 6000 रुपये दिले जाणार आहे. तसेच योजनेचा फायदा सांगताना त्यांनी 2000 हजार रुपये ऐवजी 5000 रुपये दिले जाणार आहे असा उल्लेख त्यांनी कोठेही केला नाही. तसेच या बाबतीत आणखी चौकशी केली आहे. महाराष्ट्रातील कृषीमंत्री दादाजी भुसे यांना या बाबतीत विचारल्यावर ते म्हणाले की, पीएम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत 2000 हजार रुपये ऐवजी शेतकऱ्यांना 5000 हजार रुपये दिला जाईल अस काही आमच्या कानावर आलेलं नाही. उलट बँकांच्या IFSC कोड संदर्भातील काही बाबीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नसल्याच लक्षात आल्यानंतर याबाबत कार्यवाही करावी अस आम्ही केंद्र सरकारला सांगितल आहे.
10 हप्ताची सुरुवात
शेतकरी मित्रांनो आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 9 हप्ते जमा करण्यात आले आहेत. तसेच 10 हप्ता डिसेंबर महिन्या पासून जमा करण्याची सुरुवात झाली आहे. पीएम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत आता पर्यंत 1 लाख 62 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत 10 हप्ता आला नसेल आणि या योजनेचा फायदा घेत असाल तर तुम्हाला याच डिसेंबर महिन्यात 10 हप्ता तुमच्या बॅक खात्यात केव्हाही जमा होऊ शकतो. त्यामुळे या शेतकऱ्यांनी जास्त चिंता करू नये हा लेख शेयर करायला विसरू नका.