पीएम किसान सन्मान निधी 13 वा हप्ता या तारखेला जमा होणार ? | PM Kisan 13th Installment Date 2023 | PM Kisan Kyc

PM Kisan 13th Installment Date 2023 : शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार वेगवेगळ्या प्रकारचे योजना राबवत असतात. PM किसान सम्मान निधी योजना  ( PM Kisan Samman Nidhi Yojana ) अंतर्गत आतापर्यंत १२ हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. दर चौथ्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर pm kisan योजनेतंर्गत २ हजार रुपये येतात. १२ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर येऊन जवळपास तीन महिने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे PM किसान सम्मान निधी योजनेतंर्गत 13 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी येणार याबाबत शेतकऱ्यांन मध्ये चर्चाची सुरुवात झाली आहे.

PM Kisan With Indian Prime Minister Narendra Modi
PM Kisan 13th Installment Date 2023

PM Kisan योजनेतंर्गत 13 वा हप्ता कधी येणार | PM Kisan 13th Installment Date 2023

PM किसान सम्मान निधी योजना  ( PM Kisan Samman Nidhi Yojana ) अंतर्गत एका वर्षात तीन हप्ते म्हणजे वर्षाला शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून ६ हजार रुपये मिळतात. शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या मते, २०१९ मध्ये ३.१६ कोटी शेतकरी लाभ घेत होते पण यावर्षी २०२२ ते २०२३ पर्यंत पीएम किसान सम्मान निधी योजनेतंर्गत १०.४५ कोटी शेतकरी लाभार्थी म्हणून जोडले जाणार आहे.

पीएम किसान सम्मान निधी योजनेतंर्गत १२ हप्तात जवळपास शेतकऱ्यांना १६ हजार कोटी रुपये वाटप केले आहे. जांणकरांच्या मते, २४ फेब्रुवारी पासून ते २८ फेब्रुवारी पर्यंत या तारखेच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान सम्मान निधी योजनेतंर्गत तेरावा हप्ता येण्याची शक्यता जास्त आहे.

पीएम किसान ‍4000 हजार रुपये मिळणार | PM Kisan Kyc

पीएम किसान सम्मान निधी योजनेतंर्गत ४००० हजार रुपये कसे मिळणार याबाबत सविस्तर माहिती सांगणार आहे. महत्वाचे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई केवायसी पूर्ण न केल्यामुळे त्यांना १२ वा हप्ता तसेच १३ हप्ता मिळेल याची शक्यता कमी आहे. शेतकऱ्यांनी ई केवायसी करणे महत्वाचे असून तसेच ते अनिवार्य सुध्दा करण्यात आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी ई केवायसी पुर्ण केली नव्हती. त्यामुळे त्यांना १२ वा हप्ता मिळालाच नाही. पण सरकारने १० फेब्रुवारी पर्यंत ई केवायसी पूर्ण करण्याची मुदत दिली होती. ज्या शेतकऱ्यांचा १२ वा हप्ता थकला असेल आणि ई केवायसी पूर्ण केली असेल तर त्यांना १२‍ वा आणि १३ वा हप्ता मिळून पीएम किसान योजनेतंर्गत 4000 हजार रुपये मिळणार आहे.

Leave a Comment