महाराष्ट्रातील ह्या गोष्टी जाणून घ्या

महाराष्ट्रातील ह्या गोष्टी जाणून घ्या  :

नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतातील सर्वात श्रीमंत राज्य पाहणार आहोत. भारतात महाराष्ट्राला श्रीमंत राज्य म्हटले जाते. ते का म्हटले जाते याबद्दल तपशीलवार माहिती पहा. क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील अशा गावात घराला दरवाजा नाही. आश्‍चर्याची बाब म्हणजे त्या ठिकाणी आतापर्यंत एकही चोरी झालेली नाही. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी म्हणून ओळखली जाते.

Amazing fact about Maharashtra in Marathi
Amazing fact about Maharashtra in Marathi

महाराष्ट्रातील ह्या गोष्टी जाणून घ्या

महाराष्ट्र राज्य श्रीमंत मध्ये मोजले जाते. अशी काही कारणे आहेत जसे की छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी तसेच मराठ्यांची जन्म भूमी मानले जाते. यामुळे भारतातील महत्त्वाचे राज्य म्हटले जाते. महाराष्ट्र राज्याचे गठन 1 मे 1960 झाले होते. महाराष्ट्र राज्य हे गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा नगरहवेली केंद्र शासित प्रदेशाने घेरले आहे. महाराष्ट्रात 11.42 कोरोड लोक राहतात. तसेच महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी 26 जिल्हे होते पण आता महाराष्ट्रात 2017 पर्यंत 10 जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. महाराष्ट्रात आता 36 जिल्हे आहेत. भारतात सर्वात जास्त लोकसंख्या महाराष्ट्रात आहे. तसेच भारतामध्ये लोकसंख्या नुसार महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागत आहे. भारतात सर्वाधिक हिंदी भाषा बोली जाते पण महाराष्ट्रात तुम्हाला मराठी भाषा बोलावी लागेल कारण मराठी ही महाराष्ट्राची राज्य भाषा आहे. महाराष्ट्र ही संताची भूमी म्हणून सुद्धा ओळखले जाते महाराष्ट्राचे नाव संस्कृत भाषेतील आहे महान देश असा अर्थ महाराष्ट्राचा होतो. महाराष्ट्रात 80℅ टक्के हिंदू धर्मातील लोक राहतात. बाकी 20℅ टक्के मध्ये बुद्ध आणि मुस्लिम लोक तसेच इतर राज्यातील लोक महाराष्ट्रात रहतात. महाराष्ट्र भारतातील सर्वात जास्त श्रीमंत राज्य आहे भारतात सर्वात जास्त GDP महाराष्ट्राची आहे. याचा मुख्य कारण म्हणजे मुंबई या ठिकाणी करोडाचे व्यवहार होत राहतात. महाराष्ट्रात सर्वात जास्त उत्पादन कांद्याचे घेतले जाते. जगातील सर्वात मोठा कांदा मार्केट महाराष्ट्र मधील नाशिक येथे आहे. महाराष्ट्रात 16 विमानतळ आहेत. शनि शिंगणापूर येथे वेगळीच पंरपरा आहे या ठिकाणी दरवाजाला कुलूप लावले जात नाही. कारण या ठिकाणी घराला दरवाजा नाही. या ठिकाणी चोरी होत नाही जर चोरी झाली तर त्याला शनि देव शिक्षा करील अशी मान्यता तेथील लोकांची आहे. महाराष्ट्रात 1 मे दिवशी महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. 

Leave a Comment