या जिल्ह्यात 11 जानेवारी पर्यंत मुसळधार पाऊस

दिल्ली : दिल्ली मध्ये शनिवारी जोरदार पाऊस झाला आहे. तसेच आज रविवारी सकाळी पासून हलक्या स्वरूपात पाऊस पडत आहे. दिल्ली मध्ये जो शनिवारी पाऊस झाला आहे पावसाने 22 वर्षाचा रेकॉर्ड तोडले आहे. तसेच आज तेथील वातावरणात प्रदुषण कमी झाले आहे. 

havaman andaj today
havaman andaj today

गारपीट किंवा मुसळधार पाऊस होणार

महाराष्ट्रात : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसा पासुन काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तसेच काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस सुध्दा पडला आहे. तसेच महाराष्ट्रातील काही गावात गारपीट सुध्दा झाली आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात गारपीट व जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. येणार काही दिवसात म्हणजे 11 जानेवारी 2022 पर्यंत या गारपीट किंवा मुसळधार पाऊस व काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. या मध्ये कोणते जिल्हे आहेत हे सर्व आपण या लेख मध्ये पाहणार आहोत. 

शेतकऱ्यांचे नुकसान झाले

आज पासून ते 11 जानेवारी पर्यंत महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता आहे. पैठण व श्रीरामपूर मध्ये काही ठिकाणी गारपीट झाली आहे ही बातमी सूत्रांनी दिल्याली आहे. ज्या शेतकऱ्यांनी हरभरा केला आहे त्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बुलढाणा मध्ये जोरदार पाऊस झाला आहे. हा पाऊस भाग बदलत पडत असल्याने काही अवकाळी तर काही गारपीट किंवा हलक्या स्वरूपाचा असणार आहे. वर्धा मध्ये अवकाळी पाऊस आणि जोरदार वारे असल्याने तेथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे गहू, हरभरा, बोर, अशा आणखीन पिकांना फटका बसला आहे. 

या जिल्ह्यात पाऊस

वर्धा मध्ये आज सकाळ पासून पाऊस पडत आहे. तसेच शनिवारी ठाण्यात आधीच अवकाळी पाऊस झाला आहे. आज पुन्हा मुंबई, कांदिवली, आणि दादर मध्ये सकाळ पासून ढगाळ वातावरण आहे. आज रात्री या ठिकाणी जोरदार किंवा हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकतो. तसेच अमरावती मध्ये काल रात्री अवकाळी पाऊस पडला आहे. रायगड येथे गारपीट झाली आहे. औरंगाबाद, अहमदनगर, हिंगोली, परभणी, आणि नांदेड ठाणे आणखीन काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण तसेच गारपीट किंवा मुसळधार पाऊस 9, 10, 11 जानेवारी या तारखांना होण्याची शक्यता आहे. 

Leave a Comment