Severe Rain Alert : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यातील काही जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तसेच काही ठिकाणी रिमझिम ते मुसळधार पाऊस सुध्दा झालेला आहे. हवामान विभागनं ( meteorological department ) दिलेल्या हवामान अंदाजानुसार ( weather forecast ) काल रात्री लातूर, यवतमाळ, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, हिंगोली, वाशिम, पालघर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला आहे. तसेच मुंबईसह ठाण्यात रात्रभर पावसाने थैमान सुध्दा घातले आहे. पुढील पाच दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागात तीव्र पावसाच इशारा ( severe rainfall alert ) देण्यात आला आहे.
तीव्र पावसाची हजेरी
मुंबई, ठाणेसह आणि इतर भागात मुसळधार पाऊस झाल्याने ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झालेल्या पाहिला मिळत आहे. तसेच आज सकाळ पासून पुन्हा रिमझिम पावसाची सुरुवात झालेली पाहयला मिळत आहे. हवामान विभागने ( meteorological department ) दिलेल्या माहितीनुसार आज रात्री पुन्हा मुंबई मध्ये तीव्र पावसाचा इशारा ( severe rainfall alert ) देण्यात आला आहे.
या राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
महाराष्ट्रासह गुजरात, तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. तसेच या सहा जिल्ह्यात हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे भाग बदलत तीव्र पावसाचा इशारा ( severe rainfall alert ) आहे.
या जिल्ह्यात तीव्र पावसाचा इशारा ( severe rainfall alert )
यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पुढील पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
आज पासून बुलडाणा, अकोला, औरंगाबाद, जालना, वाशीम, अमरावती, यवतमाळ, बीड, उस्मानाबाद, वर्धा, नागपूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, लातूर, पालघर, ठाणे, नंदूरबार, धुळे, मुंबई, रायगड, जळगाव, नाशिक, नगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या सर्व जिल्ह्यात १२ ऑक्टोबर पर्यंत भाग बदलत तीव्र पावसाचा इशारा ( severe rainfall alert ) देण्यात आला आहे.