Crop Insurance : राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात झाले होते. राज्य आणि केंद्र सरकार योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ असे म्हटले होते परंतु अद्याप अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत शेतकऱ्यांनसाठी मोठी घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांन मध्ये दिलासा मिळू शकतो.
Crop Insurance |
३१ मार्च पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार | Crop Insurance
विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ३ हजार ३०० कोटीची नुकसान भरपाई हि मागीतली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ६ हजार ८०० कोटी पैकी ६ हजार कोटीची मदत देण्यात आली आहे. उर्वरित रक्कम हि ३१ मार्चच्या आत नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल.
जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात अशा शेतकऱ्यांना राज्य सरकार प्रोत्याहनपर ५० हजार रुपये अनुदान देतात. नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना आतापर्यंत ४ हजार ७०० कोटी रुपये वितरीत केले व १२ लाखा पेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा मिळाला आहे. वरील संपूर्ण माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
👇👇👇👀
लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाणार