Cotton Market : जानेवारी महिन्यातील शेवटच्या दोन आठवड्यापासून कापसाच्या भावात घसरण पाहयला मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाच्या भावावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे.
Cotton Rate |
कापसाचे भाव हे ८ हजार ५०० वरुन थेट ७ हजार ८०० पर्यंत पोहचले होते. पण गेल्या आठवड्यात कापसाच्या भावात सुधारणा झाली आहे. जवळपास ७ हजार ८०० ते ८ हजार २०० पर्यंत कापसाचे भाव महाराष्ट्रात पाहयाला मिळाले आहे.
👇👇👇👀
कापसाचे भाव वाढणार ( Cotton Rate )
मागील वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताच्या कापसाला मागणी लवकरच वाढली होती. यावर्षी बाहेर देशातून कापसाची मागणी उशीरा मिळाली आहे. तसेच भारतात कापसाची निर्यात सुध्दा हळूहळू होत आहे. कापसाची निर्यात हि कमी वेगाने होत असल्यामुळे कापसाच्या भावात गती येण्यास उशीर होत आहे. जगात कापसाचा वापर जवळपास ३० टक्कांनी वाढला आहे. गेल्या आठवड्यात कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढले होते. तसेच भारतातील उद्योगाकडून कापसाची मागणी मोठ्या प्रामणात होत असल्यामुळे कापसाचे भाव वाढणार, असा अंदाज जांणकार व्यक्त करत आहे.
कापसाचे भाव १५ हजार पर्यंत जाणार का ? तज्ञांच्या मते
मागील वर्षी कापसाला १३ हजार ते १५ हजार पर्यंत कापसाला भाव मिळाला होता. तसेच यावर्षी कापसाला मध्यंतरी ८ हजार ते ९ हजार ५०० पर्यंत कापसाला भाव मिळाला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना अजूनहि वाटत आहे की कापसाला १२ ते १५ हजार पर्यंत कापसाला भाव मिळेल.
सत्य पाहता, मागील वर्षा प्रमाणे यावर्षी परिस्थिती तशी दिसत नाही. यावर्षी केंद्र सरकारने कापूस आयात केला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागील वर्षा प्रमाणे मोठी मागणी आली नाही व कापसाचे भाव सुध्दा वाढले नाही. मागील वर्षाची तुलना यावर्षी केली तर कापसाला भाव १५ हजार मिळेण कठिण दिसत आहे. असे तज्ञांचे मत आहे.
कापसाचे भाव किती वाढणार ?
कापसाचे भाव हे किती पर्यंत वाढतील असा प्रश्न सतत शेतकरी विचारत असतात. जांणकरांच्या मते, मागील आठवड्यात कापसाला ७ हजार ५०० ते ८ हजार ३०० पर्यंत कापसाला भाव मिळाला आहे. भारतात कापसाची निर्यांत वाढत असल्यामुळे या आठवड्यात कापसाच्या भावात तेजी येण्यास सुरुवात होईल. पण पुढे चालून ८ हजार ते ९ हजार ५०० पर्यंत कापसाला भाव मिळेल अशी शक्यता आहे. वरील अंदाज जांणकरांचा आहे.
👇👇👇👀