Crop Insurance : अनेक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. तर या शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई पाठवणार आहे. पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या नावाची तपासणी झाल्यास १५० कोटी ६२ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतील.
Crop Insurance |
सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात २०२२ जिल्ह्यात मोठी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या अतिवृष्टीमुळे सर्वाधिक फटका आठ तालुक्यात बसला होता. याबाबत तहसील कार्यालयाकडून पंचनामे पूर्ण होताच शासनाकडे हा अहवाल पाठवण्यात आला होता.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करण्यासाठी शासनाने लॉगीन आयडी तयार करुन तहसिलदारांनकडे पाठवली आहे. तहसिलदाराने लॉगीन आयडी वरती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनचे नावे किंवा यादी तयार करुन अपलोड करत आहे. हिच यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे.
व जिल्हाधिकारी लॉगीन आयडी वरुन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे नावे तपासले जाणार. तपासणी पूर्ण होताच हिच यादी तहसिलदारांकडे पाठवण्यात येईल. तहसीलदार हिच तलाठीकडे पाठवील व तलाठी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे नावे चौकात लावणार आहे.
नुकसान भरपाई १४६ कोटी ५८ लाख ४४ हजार, तसेच मागील राहिलेली ४ कोटी ६२ लाख एकूण १५० कोटी ६२ लाख रुपये शासनाने मंजूर केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या नावाची यादी अर्धाहून पूर्ण तपासली आहे त्यामुळे लवकरच दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होणार आहे.
👇👇👇👀
शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 13 हजार 600 रुपये मिळणार
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीत तुमचे नाव नसेल तर तुम्ही तहसिलदारकडे अर्ज करु शकतात.
👇👇👇👀
👇👇👇👀