सोयाबीनचे भाव वाढतील असे संकेत | Soybean Rate

आपला बळीराजा : महाराष्ट्रातील सोयाबीनचे भाव सध्याच्या परिस्थितीत ४ हजार ९०० ते ५ हजार ५०० पर्यंत पोहचले आहेत. जांणकरांच्या मते, सोयाबीनच्या दरात पुढे चालून मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे.

Soybean Rate

 

सोयाबीचे भाव भाव वाढणार | Soybean Rate

महाराष्ट्रात सध्या सोयाबीनच्या भावावर दबाव येत आहे. देशात सोयाबीनच्या उत्पादनात वाढ झाली असल्यामुळे बाजार समिती मध्ये आवक हि मोठ्या प्रमाणात येत आहे. ब्राझील मध्ये यावर्षी सोयाबीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे भारतातील सोयाबीनला चांगल्याप्रकारे भाव मिळाला नाही.

Farming Insurance : 32 कोटीचा पिक विमा मंजूर, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

अर्जेंटीना मध्ये यावर्षी दुष्काळ सारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तेथील सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे. ब्राझील येथील सरकारने जैवइंधनाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचा विचार केला आहे. तसेच जैवइंधनाचा वापर वाढवण्यासाठी ७० टक्के सोयातेलाचा वापर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगल्याप्रकारे भाव मिळेल अशी शक्यता असे जांणकरांच मते आहे.

सोयाबीनच्या उत्पादनात आघाडी

सोयाबीनचे उत्पादन घेण्यासाठी अर्जेंटीना तिसऱ्या क्रमांकवर तर ब्राझील पहिल्यावर क्रमांकवर येत आहे. यावर्षी अर्जेंटीना मध्ये दुष्काळ आहे तर ब्राझील मध्ये दरवर्षी प्रमाणे सोयाबीनचे उत्पादन झाले आहे. मुख्य म्हणजे सोयातेल आणि सोयापेंडची निर्यांत ब्राझील हा देश कमी करतो आणि सोयाबीनची निर्यात सर्वाधिक करतो. याच उलट अर्जेंटीना हा देश सोयाबीनची निर्यात कमीत कमी करतो आणि सोयातेल आणि सोयापेंडची निर्यांत सर्वाधिक करत आहे. अर्जेंटीना मध्ये यावर्षी दुष्काळ असल्यामुळे घट पाहयला मिळत आहे. तसेच ब्राझील देशात परिस्थितीती चांगली असल्यामुळे सोयाबीन उत्पादन आघाडीवर आहे.

कापसाचे भाव वाढणार का ? | महाराष्ट्रातील कापसाचे भाव 2023 | 03 मार्च आजचे कापसाचे भाव 2023 महाराष्ट्र | Cotton Rate

जैवइंधनाचा वापर

ब्राझील मधील सरकार आता जैवइंधनाचा वापर वाढवणार आहे. ब्राझील एनर्जी पॉलिसी कमिटीने दिलेल्या मता नुसार, ब्राझील हा जैवइंधनाचा वापर २०२१ मध्ये वाढवणार होते. २०२० मध्ये कोरोना आणि २०२१ मध्ये महागाई वाढल्यामुळे जैवइंधान मध्ये मित्राणाचे प्रमाण १२ टक्के वरुन १० टक्केच वापर केला आहे. पण ब्राझील यावर्षी १५ टक्के पर्यंत जैवइंधनाचा वापर करण्याचे उद्द‍िष्ट आहे.

Leave a Comment