DBT Scheme : राज्य सरकार आता अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या मदतीने DBT योजनेतंर्गत शेतकऱ्यांना धान्य ऐवजी पैसे देण्याचे जाहिर केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रत्येक एका व्यक्तीला १५० रुपये प्रति महिना मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
DBT Scheme |
शासनाने अन्नसुरक्षा योजनेतंर्गत १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन रुपये किलो तांदूळ, दोन गहू देण्यात येत होते. पुढे चालून जुलै महिन्यात गव्हाचे वाटप तसेच सप्टेंबर महिन्यात तांदळाचे वाटप शासनाने बंद केले आहे.
हा विषय गंभीर असल्यामुळे हिवाळी अधिवेशनात याची चर्चा सुध्दा झाली होती. ग्राहक संरक्षण व तसेच नागरी पुरवठा विभागाने कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीच्या थेट खात्यात १५० रुपये जमा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आतापर्यंत ४१ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेअंतर्गत पैसे खात्यात जमा झाले आहे.
१ लाख ९२ हजार ५५४ शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्याला २ कोटी ८८ लाख खर्च येईल अंदाज जांणकार लावत आहे. पण शासनाने ५९ कोटी ९६ लाख खर्चास मान्यता आधीच दिली आहे.