India Meteorological Department : १५ ऑगस्ट रोजी दिल्लीत आणि उत्तर प्रदेश मध्ये वातावरणात बदलत होऊ शकतो. तसेच हलका ते मध्यम प्रकारचा पाऊस पडू शकतो. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यात आज पासून बदल होणार तसेच अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस होऊ शकतो.
१५ ऑगस्ट रोजी उत्तरखंड मध्ये बहूतांश भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या महितीनुसार, हिमाचल प्रदेश मध्ये आज पासून बहूतांश भागात जोरदार पाऊस पडणार आहे. तसेच राजस्थान मध्ये आज पासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. हिमाचल प्रदेश आणि राजस्थान मध्ये १६ ऑगस्ट पासून बहूतांश जोरदार पडणार आहे.
15 August | आजचा हवामान अंदाज | India Meteorological Department
महाराष्ट्रात १३ तारखेपासून वातावरणात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी रिमझिम तसेच मध्यम प्रकारचा पाऊस होत आहे. तसेच १५ ऑगस्ट पासून १८ ऑगस्ट पर्यंत संपूर्ण राज्यात पावसाचा जोर हा कमी असणार आहे. परंतू १५ ऑगस्ट रोजी विदर्भात आणि कोकण भागात तूरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस होऊ शकतो.
मराठवाड्यात हलका पाऊस होऊ शकतो. १८ ऑगस्ट १९, २०, २१, २३, २४ ऑगस्ट पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण भागात आणि विदर्भात बहूतांश ठिकाणी पावसाचा जोर अधिक राहणार आहे. तसेच मराठवाड्या तूरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस शकतो तसेच उर्वरित भागात प्रमाणात पावसाचा इशारा आहे.
२४ ऑगस्ट पासून २५, २६, २७, २८, २९, ३० ऑगस्ट पर्यंत मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. तसेच कोकण भागात आणि विदर्भात सुध्दा पावसाचा इशारा आहे.
पंजाब डख हवामान अंदाज | 15 August 2023
पंजाब डख यांच्या मते, राज्यात १५ ऑगस्ट नंतर वातावरणात बदलत होण्यास सुरुवात होईल. १६ ऑगस्ट किंवा १७ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील विविध भागात पाऊस पडणार आहे. पूर्व आणि पश्चिम महाराष्ट्रात तसेच उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात संपूर्ण भागात पावसाचा जोर वाढणार आहे. १६ ऑगस्ट पासून ३० ऑगस्ट पर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो.