
Maharashtra Rain Update : मॉन्सून उत्तरकडे जाताच महाराष्ट्रात पावसाने उघडीप घेतली आहे. महाराष्ट्रातील कोकण भागात उत्तर दिशेला आज 7 ऑगस्ट रोजी तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाज नुसार आज उर्वरित भागात ढगाळ तसेच उन आणि तूरळक ठिकाणी रिमझिम पाऊस पडणार आहे.
आजचा हवामान अंदाज | Maharashtra Rain Update
आयएमडीने दिलेल्या अंदाजनुसार, चक्राकार वारे दक्षिण बिहार आणि समुद्र सपाटीवर वाहत आहे. परंतू कमी दाबाचा पट्टा हा उत्तरकडे सरकला आहे. सध्या मान्सूनचा पाऊस यमुनानगर, बरेली, पटना, मालदा या परिसरात पाऊस पडत आहे. पुढील काही मॉन्सूनचा आस हिमालयाच्या परिसरात राहणार आहे.
आज पावसाने महराष्ट्रातील बहूतांश भागात उघडीप घेतली आहे. हवामान खात्यानुसार आज पासून पुढील काही दिवस राज्यात बहूतांश भागात ढगाळ वातावरण तसेच रिमझिम पाऊस पडणार आहे. कोकण भागातील पालघर आणि ठाणे या परिसरात अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडणार आहे. उर्वरित भागात ढगाळ वातावरण पाहयला मिळेल.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
