आजचे कांद्याचे बाजार भाव 2023
Onions Rate : लासलगाव बाजार समिती मध्ये आज शेतकऱ्यांनकडून लाल कांद्याची आवक १६० क्विंटल तर उन्हाळी कांद्याची आवक १६ हजार ३३० क्विंटल पर्यंत आली आहे. लासलगाव बाजार समिती मध्ये लाल कांद्याला सरासर भाव ४५१ तर उन्हाळी कांद्याला सरासर भाव ६५१ पर्यंत भाव मिळाला आहे. याच बाजार समिती मध्ये लाल कांद्याला कमीत कमी २५४ तर जास्तीत जास्त ५१२ पर्यंत भाव मिळाला आहे. तसेच उन्हाळी कांद्याला कमीत कमी ३०० तर जास्तीत जास्त भाव १ हजार ०५२ पर्यंत भाव मिळाला आहे.