Onions Rate; महत्वाचे कांद्याच्या दरात होतेय मोठी घसरण, जाणून घ्या का होतेय घसरण ?

onions rate
Onions Rate

 

Onions Rate : महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन शेतकरी ( Onions Farmers ) मोठ्या प्रमाणात घेत आहे. अहमदनगर, बुलढाणा, नाशिक, पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. यावर्षी कांद्याच्या भावात घसरण होत असल्यामुळे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे कांद्याच्या भावात सहाय्य करावे अशी विनंती करण्यात आली होती. तरीही कांद्याच्या भावात सुधारणा होत नाही. कांद्याच्या भावात का घसरण होतेय ? चला जाणून घेऊया…

Onions Market : बाजार समिती मध्ये कांद्याची आवक वाढली, दरात घसरण झाली
महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात मध्ये कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. पण यावर्षी इतर राज्यात कांद उत्पादक शेतकरी वाढल्याने, कांद्याचे उत्पादन सुध्दा वाढले आहे. महाराष्ट्रासह इतर प्रमुख राज्यात हवामानात अद्रता वाढली, तसेच गारपीठ, वादळी पाऊस, रोग राईचा परिणाम होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. शेत मालाला भाव मिळत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनवर तंगी आल्यामुळे शेतकरी निम्म्याच दराने कांदा विकत आहे.

Unseasonal Rain : कांद्याची घसरण का होत जाणून घ्या ?
जांणकरांच्या मते, राज्यात अवकाळी पावसाचे ( Unseasonal Rain ) वातावरण होत असल्यामुळे साठवलेला कांद्याचे नुकसान होऊ नये. यामुळे राज्यातील शेतकरी बाजार समिती मध्ये कांदा विकत आहे. राज्यातील बाजार समिती मध्ये कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या दरावर परिणाम झालेले दिसत आहे.

Onions Production : महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन सर्वाधिक
दरवर्षी महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. कांद्याचे उत्पादन वर्षातून कांदा उत्पादक शेतकरी तीन वेळा घेतात. पण शेतकऱ्यांन समोर अनेक अडचणी सुध्दा उभा राहतात. गारपीठ कांद्याचे नुकसान किंवा रोग राई मुळे सुध्दा कांद्याचे नुकसान, हवामानात अद्रता वाढली तर साठवलेल्या कांद्याचे नुकसान अशा प्रकारच्या शेतकऱ्यांन समोर अडचणी असतात. तरीही देशात ४३ टक्के कांद्याचे उत्पादन फक्त महाराष्ट्रात सर्वाधिक घेतले जाते. गुजरात आणि कर्नाटक मध्ये ९ टक्के तर मध्य प्रदेश मध्ये १६ टक्के कांद्याचे उत्पादन घेतले जाते.

NEW UPDATE : शेतकऱ्यांनसाठी दमदार बातमी; राज्य सरकारकडून पहिला हप्ता पुढील महिन्यात येणार, २ हजार रुपये मिळवण्यासाठी आताच हे काम करा

Leave a Comment