कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर ! शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अनुदान जाहिर | Farming Insurance

Farming Insurance : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे कांद्याला भाव मिळत नाही तसेच दुसरीकडे पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

Farming Insurance
Farming Insurance

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदे यांनी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनसाठी विधानसभेत सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधानसभेत बोलत असताना असे सांगितले क‍ि, माझ्याकडे अर्ज आला होता. त्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये देण्याची मागणी होती. पण आम्ही असा निर्णय घेतला की राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे ठरवले आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी विधानसभेत विरोधी पक्षानी यावरती चर्चा सुरु केली. चर्चा होत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना उत्तर देताना असे म्हटले की, भारतात कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ४३ टक्के आहे. यावर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. बाजारपेठेत लाल कांद्याची आवक मोठी होती तसेच इतर राज्यात सुध्दा कांद्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे राज्यात कांद्याचे भाव घसरले आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकार प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे ठरवले आहे.

Leave a Comment