मार्च 2023 महिन्यात शेतकऱ्यांना अनुदान घोषित केले होते. अनुदान कमी असल्याने यावरती महाराष्ट्रात मोठी चर्चा झाली होती.

३१ मार्च पर्यंत सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असे महाराष्ट्र सरकारकडून अहवान करण्यात आले होते.

मागील महिन्यात शेतकऱ्यांनी अनुदान मिळवण्यासाठी खुप प्रयत्न केले होते. पण कमी कालावाधीत अनेक शेतकऱ्यांना अर्ज करता आला नाही.

अनेक राज्यात मागील महिन्यात कांद्याची आवक वाढल्याने महाराष्ट्रातील बाजार समिती मध्ये कांद्याचे भाव घसरलेले होते.

त्यामुळे राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी प्रति क्विंटल मागे ३५० रुपये अनुदान देण्याची घोषणा अधिवेशनात करण्यात आली होती.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे यासाठी राज्य सरकारने अनुदान अर्जासाठी ३० एप्रिल पर्यंत मुदत वाढवली आहे.

आताच आमच्या वेबसाइटवर भेट द्या