भेंडवळची भविष्यवाणी बुलढाणा मध्ये सर्वाधिक प्रसिध्द आहे. या भविष्यात शेतकऱ्यांनसाठी काय म्हटले हे आपण पाहणार आहोत.
यावर्षी पाऊस कसा असणार ?
जून मध्ये कमी पाऊस, जुलै मध्ये मध्यम प्रकाराचा पाऊस, ऑगस्ट मध्ये प्रचंड पाऊस आणि सप्टेंबर मध्ये कमी पाऊस असणार आहे.
यावर्षी ऑगस्ट मध्ये प्रचंड पाऊस होणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर मध्ये पाऊस कमी झाल्यास पुढे चालून अवकाळी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसेल, पण शेतकऱ्यांना यावर्षी चांगले उत्पादन होईल असे हि सांगण्यात आले आहे.
घट मांडणीत प्रथम विंचू पाहयला मिळाल्यामुळे देशात रोगराई सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.