Onions Rate Live : महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती मधील लासलगाव येथील कांद्याचे भाव हे ढासळले आहेत.
Onions Rate Live |
आजचे कांद्याचे भाव 2023 ( Onions Rate Live )
लासलगाव कांद्याचे भाव : महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज कांद्याचे भाव हे कमी झालेले आहेत. ३ फेब्रुवारी लालसगाव बाजार समिती मध्ये कांद्याचे भाव हे १ हजार ६०१ वरती होते पण आज ४ फेब्रुवारी कांद्याच्या कमालीच्या भावात १ हजार ४३२ प्रति क्विंटल मिळत आहे. या बाजार समिती कमीत कमी भाव ६०० तर सरासरी भाव १ हजार १५० इतका लाल कांद्याला प्रति क्विंटल भाव मिळत आहे. आता पर्यंत लासलगाव बाजार समिती मध्ये लाल कांद्याची आवक १४००० पर्यंत पोहचली आहे.
👇👇👇👇👇
लासलगाव निफाड कांद्याचे भाव : महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आतापर्यंत लाल कांद्याची आवक १००० क्विंटल आलेली आहे. लालसगाव निफाड बाजार समिती मध्ये आज कांद्याचे भाव हे ढासळ्याल्यामुळे कांद्याची आवक सुध्दा कमी झालेली आहे. ४ फेब्रुवारी १७०० पर्यंत आवक आली होती पण आज १ हजार पर्यंतच आवक पोहचली आहे. तसेच काल कांद्याला भाव १ हजार १५१ इतका भाव मिळाला आज १ हजार ०९९ प्रति क्विंटल दर मिळाला आहे. लालसगाव निफाड बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ५८१ तर जास्तीत जास्त भाव १ हजार ०९९ प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तसेच सरासरी लाल कांद्याला भाव १ हजार ०४० इतका लालसगाव बाजार समिती मध्ये मिळाला आहे.
👇👇👇👇👇
लासलगाव विंचूर कांद्याचे भाव : महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज लासलगाव विंचूर येथे कांद्याच्या भावात उतार होत आहे. या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ६०० ते कमालीचा भाव १४५१ लाल कांद्या भाव मिळाला आहे. तसेच लासलगाव विंचूर बाजार समिती मध्ये सरासरी कांद्याला भाव १२०० प्रति क्विंटल मिळाला आहे. लाल कांद्याची आवक आतापर्यंत या ठिकाणी २ हजार ५०० पर्यंत आली आहे.