Big Update ; पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळतो, त्याच प्रकारे नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे.
मे महिन्यात तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; Big Update
शेतकऱ्यांनी शेती सोबत व्यवसाय केला पाहिजे, शेती मध्ये नवनवीन प्रयोग केले पाहिजे, शेती मध्ये तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीचा वेग वाढवला पाहिजे. यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना आधार म्हणून योजनेअंतर्गत निधी देतात. तंत्रज्ञानाचा वापर करायचा तर त्यावर सब्सिडी सुध्दा देतात. आता राज्य सरकारने शेतकऱ्यांनसाठी १ रुपायात पिक विमा मंजूर करण्याचे ठरवले तसेच नुकसान भरपाई मध्ये शासन निर्णय काढून रक्कम सुध्दा वाढवली आहे.
पंतप्रधान नंरेद्र मोदी यांनी ज्या प्रकारे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत दर चार महिन्यात २ हजार रुपये वर्षात तीन हप्ते म्हणजे ६००० रुपये देण्याचे काम करत आहे. त्याच पाठोपाठ नमो शेतकरी महासन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या निकाषावरुनच हि योजना राबवण्यात येणार आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने जवळपास १ कोटी १० लाख ३९ हजार शेतकऱ्यांना २३ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. १ कोटी १० लाख ३९ हजार शेतकऱ्यांना पैकी फक्त ८१ लाख ३८ हजार १९८ शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे. १ कोटी १० लाख ३९ शेतकऱ्यांन पैकी शेतकऱ्यांनी पूर्ण ई केवायसी पूर्ण केली नाही तसेच राज्य सरकारने अटी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे नावे वगळण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ईकेवायसी पूर्ण केली नाही, अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ईकेवायसी पूर्ण करावी, कारण बंधनकारक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत २ हजार रुपये येणार आहेत. केंद्र सरकारने १३ हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्या नंतर १५ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात राज्य सरकारकडून १ पहिला हप्ता जमा करण्यात येणार आहे. तज्ञांच्या मते, राज्य सरकार ३ आठवड्यात किंवा ४ चौथ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करतील असे संकेत मिळत आहे.