Cotton Rate : आज महाराष्ट्रात सरासरी कापसाला ८ हजार ते ८३०० पर्यंत दर मिळाला आहे. अनेक बाजार समिती मध्ये कापसाची आवक हि घटलेली पाहयला मिळत आहे. कापसाचे भाव हे स्थिर असून सुध्दा शेतकरी कापूस विक्री करण्यापासून आपली पाठ फिरवत आहे. कापसाचे दर हे वाढतील अश्या आशाने शेतकऱ्यांनी घरातच कापसाची साठवणूक केली आहे.
Cotton Rate |
कापसाचे भाव कधी वाढतील का ? ( Cotton Rate )
अमेरिका, पाकिस्तान, भारत, इंडोनेशिया आणि बांग्लादेशात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खास करुन अमेरिका, पाकिस्तान तसेच इंडोनेशिया या देशात कापसाचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज जांणकरांचा आहे.
चीनने मध्ये मागील वर्षी ४२५ लाख कापसाच्या गाठींचा वापर करण्यात आला आहे तसेच यावर्षी सुध्दा चीन मध्ये मागील प्रमाणेच वापर होण्याचा अंदाज आहे. कोरोनामुळे तेथील व्यापार हे मंद गतीने चालू असल्यामुळे मागणी हि कमी झाली होती पण आता चीन मध्ये परिस्थिती सुधारणा होत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे कापसाचे भाव हे सुधारणार असे जाणंकार सांगत आहे.
चीन मध्ये आणि पाकिस्तान मध्ये कापसाचे दर हे वाढलेले आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव वाढतील तसेच आज भारतात सुध्दा काही बाजार समिती मध्ये कापसाच्या दरात सुधारणा झालेली आहे.
कापसाचे भाव वाढणार का ?
सरकी, सरकीची पेंड तसेच सरकीच्या तेलाचे दर हे स्थिरावले आहेत. या आठवड्यात सरकीला मागणी वाढल्यामुळे सरकीचे दर हे वाढलेले आहे. चालू आठवड्यात ३५०० ते ४००० प्रति क्विंटल पर्यंत सरकीचे दर हे वाढलेले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चालू आठवड्यात कापसाचे दर हे ८२.१७ सेंट म्हणजे रुपायात सांगायचे म्हटले तर १४ हजार ७२४ रुपये सोमवारी असे भाव होते. शुक्रवारी अतिंम टप्यात ८६.७६ सेंट रुपायात सांगायचे म्हटले तर १६ हजार १२१ रुपये प्रति क्विंटल कापसाला दर मिळाला आहे. म्हणजेचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुध्दा १४०० रुपायांनी कापसाचे दर हे वाढले आहे.
कापसाची विक्री करावी का ?
जाणंकरांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तसेच इतर देशात सुध्दा कापसाचे दर वाढलेले आहे. चीन मध्ये कापसाचा वापर मागील वर्षापेक्षा जास्त राहण्याचा अंदाज असल्यामुळे कापसाची मागणी हि वाढू शकते.
भारतात हि यावर्षी कापसाचे उत्पादन घटणार असा अंदाज काही अभ्यासकांनी दिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याची घाई करु नये, बाजाराचा आढावा घेऊनच शेतकऱ्यांनी कापूस विक्री करावा.