Soybean Rate News : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिक लागवड करतात. सोयाबीन दरावर अनेक घडामोडीचा प्रभाव पाहयला मिळतो. सोयापेंड, सरकी, मकाचे दर, खाद्या तेल अश्यापक्रारचे दर पाहूनच सोयाबीन दर ठरले जाते.
Soybean Rate News |
अर्जेंटीना मध्ये सोयाबीनचे उत्पादन कमी ( Soybean Rate News )
अर्जेंटीना मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सोयाबीन पिक घेतात. या ठिकाणी अनेक भागात कमी पावसामुळे तेथे दुष्काळ सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथे सोयाबीन पिक तसेच इतर पिकांना सुध्दा धोका निर्माण झाला आहे. अमेरिका मध्ये सुध्दा सोयाबीन पिकांची लागवड होत असते पण तेथे सुध्दा अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांना फटका बसला आहे. अर्जेंटीना हा देश सोया पेंड निर्यात, जगात मोठ्या प्रमाणात करतात. अमेरिकाच्या कृषी विभागाच्या मते, यावर्षी अर्जेंटीना मध्ये भंयकर दुष्काळ पडल्याने तेथे सोयाबीन उत्पादन कमी होणार असल्यामुळे सोयाबीन दरात थोडीशी वाढ आपणास पाहयला मिळणार आहे.
सोयाबीन दर वाढीची प्रतिक्षा संपली
खाद्या तेलाचे दर, कापूस सरकीचे दर, मक्याचे दर या सर्व दरावर परिणाम झाल्यास सोयाबीन दरावर सुध्दा याचा परिणाम होतो. बाजारपेठेत जर मका आणि कापूस सरकी यांना मागणी वाढली तर सोया पेंडला सुध्दा मागणी वाढते. अर्जेंटीना मध्ये दुष्काळ असल्यामुळे जगात सोयाबीनची मागणी हि मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. तसेच सोया पेंडची सुध्दा मागणी वाढणार त्यामुळे सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता आहे असे जाणंकरांच मत आहे.
सोयाबीनचे दर वाढतील का ?
असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांना पडत आहे. जाणंकार लोक याबाबत बोलण्याच टाळत आहे. पण परिस्थिती पाहता, अर्जेंटीना मध्ये जर सोयाबीनचे उत्पादन कमी झालेच तर देशातील बाजारपेठेत सोयाबीनचे दर थोडे फार वाढू शकतात, पण खुपच दर वाढतील असे चित्र पाहयला सध्या मिळत नाही.