Cotton Rate 2023 : नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात कापसाची कमतरता आहे. मागील वर्षी कापसाची कमतरता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कापसाला चांगल्याप्रकारे भाव मिळाला होता. यावर्षी सुध्दा कापसाला १० हजार पेक्षा जास्त भाव मिळेल या आश्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस रोखून ठेवला आहे. WhatsApp Group
मकरसंक्रांती पासून कापसाचे भाव ( Cotton Rate 2023 ) सुधारणार
आज ( 6-01-2023 ) कापसाला महाराष्ट्रात सरासरी ८५०० ते ९००० पर्यंत दर मिळाले आहेत. मागील भारतात कापसाची कमतरता असून सुध्दा केंद्र सरकारने कापूस आयात केला नाही तसेच आंतरराष्ट्रीय बाजार समिती मध्ये कापसाची मागणी सुध्दा वाढली होती. तसेच मागील वर्षी चीन ने कापासाची आयात मोठ्या प्रमाणात केली होती. यावर्षी जांणकरांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी हि उशीरा असु शकते. यावर्षी चीन मध्ये कोरोना व्हयरस कहर असल्यामुळे तेथील बाजार पेठे हि बंद आहे. भारतात कापसाची उत्पादन वाढले आहे. तसेच केंद्र सरकारने यावर्षी कापसाची आयात बाहेर देशातून मोठ्या प्रमाणात केली आहे. जाणंकरांच्या मते तरीही बाजार पेठेत कापसाच्या भावावर जास्त परिणाम होणार नाही. मागील वर्षा प्रमाणे यावर्षी सुध्दा मकरसंक्रांती पासून कापसाच्या भावात सुधारणा पाहयला मिळेल.