Cotton Rate : पांढऱ्या सोन्याला पुन्हा येणार का तेजी ?

Cotton Rate : डिंसेबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यापर्यंत कापसाचे भाव स्थिर होते. पण शेवटच्या आठवड्यात सुरुवातील कापसाचे भाव घसरले होते, ३१ डिंसेबर आणि १ जानेवारीपासून कापसाच्या भावात सुधारणा झालेली पाहयला मिळाली आहे. महाराष्ट्रात सरासरी जवळपास ८००० हजार ते ८५०० पर्यंत कापसाला भाव मिळत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी ५०० ते १००० रुपयांनी कापसाचे दर घसरलेले पाहयला मिळत आहे. डिंसेबर २०२१ मध्ये महाराष्ट्रात सरासरी ८५०० ते ९५०० पर्यंत कापसाचे दर पाहयला मिळाले होते.

Cotton Rate
Cotton Rate

कापसाचे भाव वाढणार का ? ( Cotton Rate ) 

नवीन वर्षांच्या निमित्याने सुरुवातील कापसाला भाव ८ हजार ते ८५०० पर्यंत देण्यात आला आहे. मागील आठवड्यात कापसाचे दर जवळपास ८०० ते ५०० रुपयांनी घसरले होते त्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये चिंता वाढली होती. १ डिंसेबर रोजी कापसाच्या भावात तेजी आल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कापसाचे भाव न वाढण्याचे कारण म्हणजे केंद्र सरकार आहे. 

यावर्षी केंद्र सरकारने शेतकऱ्यांनवर अन्याय केला आहे असे शेतकरी म्हणत आहे. ऑस्ट्रेलियामधून ३ लाख पेक्षा कापसाच्या गाठी म्हणजे ५१ हजार पेक्षा जास्त कापूस केंद्र सरकार भारतात आयत करणार आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने कापूस आयातीवर ११ टक्के कर माफ केले आहे. यामुळे राज्यातील नव्हे संपूर्ण बाजार समिती मधील कापसाच्या भावावर मोठा परिणाम पाहयला मिळेल 

मागील दोन वर्षांत कापसाच्या उत्पादनात मोठी घट असल्यामुळे कापड गिरण्या ठप्प होत आहे, यामुळे व्यापारी, कारखानदार याबाबत वारंवार केंद्र सरकारकडे बाहेर देशातून कापूस आयत परवानगी मागत होते. 

काही तज्ज्ञांच्या मते, कापूस लागवड यावर्षी मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. यावर्षी अतिवृष्टी तसेच बोंडआळीचा प्रादभार्व कापसावरतील पाहयला मिळाला आहे.  तसेच यावर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना योग्य कापसाचे उत्पादन झाले नाही तसेच मागील वर्षी प्रमाणे कापसाला योग्य भाव मिळेल या आश्याने शेतकऱ्यांनी कापूस रोखून ठेवला आहे. त्यात केंद्र सरकारने बाहेर देशातून मोठ्या प्रमाणात कापूस आयात केल्याने याचा परिणाम महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील बाजारपेठेत दिसून येणार आहे. यामुळे कापसाचे भाव वाढतील यांची शक्यता कमी दिसून येत आहे.

Leave a Comment