Samrakshane Insurance : १ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना ५६ कोटीचा पिक विमा मंजूर !

Samrakshane Crop Insurance : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. सतत पाऊस होत असल्यामुळे शेतातील पिकांची नासाडी तसेच योग्य उत्पादन होत नसल्याने शेतकऱ्यांची प्रगती होत नाही. यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता. ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात अतिवृष्टी होताच शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे पिकांच्या नुकसानाची तक्रार सुध्दा केली होती.
Samrakshane Insurance
Samrakshane Insurance

वाशिम : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्या माहिती नुसार आता पर्यंत जिल्ह्यात जवळपास १ लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा पैसे पाठवण्यात आले आहेत. तसेच उर्वरित ६६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर सुध्दा लवकरच खात्यावर पैसे पाठवण्यात येणार आहे. २ लाख ८० हजार शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता तसेच त्यापैकी १ लाख ५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ५६ कोटी १५ लाख नुकसान भरपाई जमा केली आहे. वाशिम जिल्ह्यात पात्र असलेले शेतकरी १ लाख ६६ हजार इतके आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा झाली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच नुकसान भरपाई जमा करण्यात येईल. उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई टप्याटप्याने मिळण्याची शक्यता जास्त आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमाची रक्कम पहिल्या टप्प्यात कमी येऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरु नये पुढील टप्यात तुमची रक्कम जमा होईल.
जामखेड : खरीप हंगाम २०२२ ते २०२३ तीन हजार १०० शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेतंर्गत १ कोटी ५ लाख ९० हजार ५९५ रुपये इतकी नुकसान भरपाईची रक्‍कम मिळाली आहे. सोयाबीन, तूर, बाजरी, कांदा, मुग, कापूस अशा पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फाटका बसला आहे. खासदार डॉ, विखे पाटील यांच्या माहिती नुसार तीन हजार १०० शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई वर्ग करण्यात आली आहे. पिक विमा अपडेट WhatsApp Group जॉईन व्हा

Leave a Comment