Grant : शेतकऱ्यांना ४ लाखांपर्यंत विहीरीसाठी मिळणार अनुदान! सविस्तर माहिती

सोलापूर : शेतकऱ्यांना खाजगी विहिरीसाठी ४ लाखांपर्यंत अनुदान देण्यासाठी शासनाने १ महिन्यापूर्वीच तयारी सुरु केली होती. जे शेतकरी ग्रामसभेत लाभार्थी म्हणून ठरवले आहेत अशा शेतकऱ्यांना पुन्हा गट विकास अधिकारी यांची सुध्दा मान्यता घ्यावी लागते. काही दिवसात तांत्रिकी मान्यता मिळवणे गरजेचे आहे.

Grant
Grant

तुमच्या गावात ग्रामसभानंतर १० पेक्षा अधिक शेतकऱ्यांकडून अर्ज आले असतील तर ग्रमसभा घेऊनच मान्यता द्यावी अशी सूचना शासनाने दिल्या आहेत. महाराष्ट्रातील कुटूंबाना मनरेगाच्या माध्यमातून १४.९ टक्के दारिद्र रेषेखालील लोकांना किंवा कुटूंबाना लखोपती करण्याचे धोरण आहे. 

मागे भूजल सर्वेक्षण घेण्यात आले होते. भूजल सर्वेक्षणातून मिळालेल्या माहिती नुसार आता महाराष्ट्रात ३ लाख ८७ हजार ५०‍० विहिरी खोदणे शक्य आहेत. शासन निर्णय १७ डिंसेबर २०२२ या तारखेला प्रसारित झाला आहे. 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत‍ सिंचन विहिरींची कामे सुरु करण्यास परवानगी मिळालेली आहे. शेतकऱ्यांन मधील एकदा लाभार्थी निश्चित झाल्यावर त्यामध्ये दिवांग व्यक्ती, अनुसूचित जाती, भटक्या जाती, दारिद्रय रेषेखाली कुटूंब असे इतर जातींना सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान ४० गुंठे सलग जमीन, तुमच्या नावावर असणे गरजेचे आहे. तसेच आठ-अ, सात-बारा-उतारा, जॉबकार्ड प्रत असे इत्यादी कागदे पत्रे लागतात.

विहिर मिळवण्यासाठी काय अटी आहेत ? 

Leave a Comment