Cyclone : राज्यातील काही भागात पुन्हा गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक भागात तापमानात वाढ सुध्दा झालेली पाहयला मिळाली आहे. गेल्या १५ दिवसात राज्यातील काही जिल्ह्यात वारंवार अवकाळी पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला सर्वाधिक मोठा फटका बसत आहे. पंजाब यांनी दिलेल्या अंदाजानुसार आज आणि उद्या राज्यातील काही भागात पावसाळ्या सारखा पाऊस आणि प्रचंड गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे.
च्रकवादळ ( cyclone ) तीव्र होणार
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक भागात चक्रवादळाचा परिणाम पाहयला मिळणार आहे. बंगालाच्या उपसागारात चक्रवादळ तयार होणार असून ७ मे किंवा ८ मे रोजी चक्रवादळ हे रौद्र रुप धारण करण्याची शक्यता आहे. पण जांणकरांच्या मते, चक्रवादळाची दिशा अजून कळाली नसल्याने चिंत व्यक्त होत आहे. १० मे किवा ११ मे तारखेला चक्रवादळाची दिशा कळेल त्यानुसार पुढील अंदाज देत येईल.
पंजाब डख हवामान अंदाज
नाशिक, आटपाडी, उस्मानाबाद, पंढरपूर, सातारा, सांगली, जत, कोल्हापूर या जिल्ह्यात अवकाळी पावसाचे संकट तसेच गारपीट प्रचंड होण्याची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात या भागात गारपीट आणि पावसाळ्या सारखा पाऊस होणार असा अंदाज पंजाब डख यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना महत्वाची सूचना : पंजाब डख यांचा हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर जॉईन सामील व्हा.