Mocha Cyclone Maharashtra Rain : गेल्या काही दिवसापासून राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. तसेच आत मोचा चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक पुन्हा एकदा पावसाचे थैमान होऊ शकते. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात चक्री वादळा मुळे मुसळधार पाऊस होण्याची शक्यत वर्तवली आहे. आज मराठवड्यात अनेक भागात सकाळ पासून भाग बदल पाऊस झाला आहे.
बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा झाल्यामुळे तेथे एक मोचा नावाचा चक्रीवादळ निर्माण झाले आहे. या चक्रीवादळा मुळे महाराष्ट्रातील बहूतांश भागात वादळी पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ भागात अवकाळी पाऊस होऊ शकतो. चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह इतर ११ राज्यांना सुध्दा धोक निर्माण होण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात भाग बदलत किंवा तूरळक ठिकाणी पाऊ होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना महत्वाची सूचना : रोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर जॉईन व्हा