Wearther Update : महाराष्ट्रातील अनेक भागात आजपासून गारपीट होण्याची शक्यता

Weather Update : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात भाग बदल अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. १५ मार्च पासून १८ मार्च पर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Weather Update
Weather Update

महाराष्‍ट्रात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण भागात धो धो पाऊस होणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज सांगितला आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात पावसाचे वातावरण राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी.
अहमदनगर, नाशिक,छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात मागील दिवसात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुन्हा एकदा या जिल्हांना नुकसानीला समोर जावे लागू शकतात.
धुळे, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना या जिल्हांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज पासून पुढील दोन दिवसात जिल्ह्यांत भाग बदलत पासून होऊ शकतो.
आज पुणे, जालना, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, हिंगोली या जिल्ह्यात आज जोरदार वारे वाहतील तसेच भाग बदलत पाऊस सुध्दा होऊ शकतो.

Leave a Comment