Cotton Seeds : मोठा निर्णय, कापूस बियाणे 1 जून पूर्वी विकल्यास कारवाई होणार

Cotton Seeds : मोठा निर्णय, कापूस बियाणे 1 जून पूर्वी विकल्यास कारवाई होणार
Cotton Seeds : मोठा निर्णय, कापूस बियाणे 1 जून पूर्वी विकल्यास कारवाई होणार

 

Cotton Seeds : महाराष्ट्रात तसेच गुजरात मध्ये कापूस पिक सर्वात जास्त घेण्यात येते. पण मान्सून लवकरच येणार असल्यामुळे दरवर्षी प्रमाणे शेतकरी महिन्या अगोदरच शेती संबधीत तयारी करत असतात. सरकारने यावर्षी कापूस संबधीत मोठा निर्णय घेतला आहे. शेतकरी मित्रांनो मान्सून येण्या आगोदर अनेक शेतकरी कापूस लागवड करत असतात. शेतकऱ्यांच्या मते मान्सून येण्याआगोदर कापसाची लागवड केल्यामुळे कापसाचे उत्पादन चांगले वाढते. पण कृषी विभागाच्या मते राज्यात दरवर्षी बोंडआळीचा प्रादभार्व मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे उत्पादन हे कमी सुध्दा होत आहे.

कापूस बियाणे 1 जून पूर्वी विकल्यास कारवाई होणार, Cotton Seeds

कृषी विभागाच्या मते, ज्या प्रकारे मान्सून अगोदर कापूस लागवड वाढत आहे. त्याप्रकारे राज्यात गुलाबी बोंड आळीचा प्रादभार्व वाढत आहे. पश्चिम विदर्भात गुलाबी बोंडाळीचा प्रादभार्व सर्वाधिक पाहयला मिळत आहे. राज्यात २०१७ पासून ते आतापर्यंत विविध भागात बोंड आळीचा प्रकोप वाढत असल्यामुळे विविध उपाय कृषी विभागाने केले आहे. पण यात उपाययोजना मध्ये फक्त गुलाबी बोंड आळीचा प्रादभार्व हा कमी झालेला पाहयला मिळतो. गुलाबी बोंड आळीचे चक्र मोडण्यासाठी कृषी विभागाच्या मते राज्यात मान्सून अगोदर कापूस लागवड थांबवणे अतिशय महत्वाचे आहे. यामुळे मान्सून अगोदर कापूस लागवड थांबली तर गुलाबी बोंड आळीचे चक्र थांबवण्यात किंवा त्याचा विस्तार चक्र थांबवण्यात येईल.

राज्यात कृषि विभागाच्या तर्फे निविष्ठ विक्रेत्यांना १ जून पूर्वी कापूस बियाणे विकण्यास मनाई केली आहे. जर १ जून पूर्वी विक्री केल्यास कृषी निविष्ठ विक्रेत्यांन वर कडक कारवाई होईल आणि किरकोळ दुकानदारचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.

रोज कापसाचे भाव जाणून घेण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर जॉईन व्हा

Cotton seeds : कापूस बियाणे या कंपन्या मध्ये मिळतात || किती प्रकारचे कापूस बियाणे तसेच त्याचे वैशिष्ट्ये जाणून घ्या

Leave a Comment