Farming Insurance : 2 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात

Farming Insurance : 2 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात
Farming Insurance : 2 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात

 

Farming Insurance : मागील वर्षी खरीप हंगामा संप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांचे पिकांचे पावसामुळे नुकसान झाले होते. सप्टेंबर महिन्यात १ लाख ५५ हजार ३५६ हेक्टर वर अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली आहे. या दोन महिन्यात २ लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. १ लाख ३४ हजार ९०४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दुप्पट दराने अनुदान देण्यात येईल असे राज्य शासनाने घोषणा केली होती.

आता पर्यंत १६४ कोटी ७८ लाख ९२ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरीत करण्यात आले आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दुप्पट अनुदान तसेच तीन हेक्टर पर्यंत अनुदान देण्याची घोषणा देऊ अशी घोषणा होती. त्याच प्रकारे शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली आहे. पण अजूनही २९ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई का मिळाली नाही पुढे सविस्तर वाचा. 

यावर्षी नगर जिल्ह्या प्रशासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई रक्कम २९० कोटी ९१ लाख ४२५ रुपायाचा निधी मागवण्यात आला होता. पण राज्य शासनाने या उलट २९१ कोटी ४ लाख निधी मंजूर करुन जिल्ह प्रशासनाच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हि रक्कम जमा करण्यास आदेश दिले होते.

१ लाख ६४ हजार ८३६ शेतकऱ्यांना जवळपास १९८ कोटी ३१ लाख ८० हजार रुपायांचे अनुदान मंजूर करुन पाठवण्यात आले आहे. परंतू आतापर्यंत १६४ कोटी ७८ लाख ९२ हजार रुपये १ लाख ३४ हजार ९०४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हि रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा करण्यात येणार आहे.

२९ हजार ९३२ शेतकऱ्यांच्या बँक खातेत ३३ कोटी ५२ लाख ८८ हजार रुपये हे अनुदान जमा न होण्याचे कारण उदा. चुकीचे खाते क्रमांक देणे, आधार कार्ड नंबर चुकवणे किंवा नसणे, आधार नंबर खातेशी सलंग्न नसणे किंवा बँक खातेत उलाढाल नसल्याने खाते बंद होणे. २९ हजार ९३२ शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर रक्कम जमा करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. Farming Insurance

शेतकरी असाल तर आमच्या WhatsApp Group वर सामील व्हा नवनवीन माहिती मिळवा

Cotton Seeds : मोठा निर्णय, कापूस बियाणे 1 जून पूर्वी विकल्यास कारवाई होणार
Cotton Seeds : मोठा निर्णय, कापूस बियाणे 1 जून पूर्वी विकल्यास कारवाई होणार

Leave a Comment