Irrigation scheme : महाराष्ट्रात जवळपास ८५ टक्के लोक शेती करतात. महाराष्ट्रात प्रमुख उत्पादन्नाचा मार्ग म्हणजे शेती हाच पर्याय आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी कोरडवाहू असल्यामुळे पाहिजे तेवढे उत्पादन होत नाही. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. विचार केला तर महाराष्ट्रात अनेक असे भाग आहेत त्या ठिकाणी पाण्याचे नियोजन तसेच सरकार तर्फे सुविधा सुध्दा उपलब्ध नाही. या गोष्टीचा करत सरकारने कोरडवाहू जमिनीसाठी नवीन योजना उभारत, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचनावर 90 टक्के अनुदान मिळणार आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार तर्फे शेतकऱ्यांना अनुदान देऊन शेतात ठिबक सिंचन उभारता येईल, या दृष्टिकोनातून सरकारने योजना काढली आहे. शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी अनुदान मिळणार आहे.
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी सर्वात अगोदर या योजनेअंतर्गत ७ वर्षात लाभ मिळवलेला नाही पाहिजे. सर्वात महत्वाचे शेत जमीन आणि शेती जमिनीचे कागद पत्रे असणे आवश्यक आहे. उदा. सातबारा, आठाचा उतारा
अनुसूचित जाती तसेच जमातीनुसार योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी जातीचे प्रमाण पत्र बंधनकारक आहे. पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजना आणि मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना या दोन योजनाअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे केंद्र तर्फे शेतकऱ्यांना ५५ टक्के तर राज्य सरकार तर्फे २५ टक्के पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.