Rabi Crop Insurance : १८ कोटी ७८ लाखाचा पिक विमा मंजूर ! सविस्तर माहिती

नांदेड : २०१६ पासून पंतप्रधान पिक विमा योजनेची सुरुवात झाली होती. पंतप्रधान पिक विमा या योजनेतून शेतकऱ्यांना फायदा होतो म्हणून शेतकरी यात जास्त सहभाग घेतात. यामुळे पंतप्रधान पिक विमा योजना हि जगात तिसऱ्या क्रमांकवर आली तसेच येणाऱ्या काळात हि योजना प्रथम क्रमांकवर असणार असे केंद्रिय कृषी मंत्री यांचा दावा आहे.

Rabi Crop Insurance
Rabi Crop Insurance

मागील वर्षी ३४ हजार ३५८ हेक्टरवर पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, मुदखेड, मुखेड, नायगाव अशा १६ तालुक्यात गहू, रब्बी तसेच ज्वारी, हरभर या पिकांना सर्वाधिक फटका बसला होता. पंतप्रधान पिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी २ कोटी ८७ लाखाचा विमा भरला होता. राज्य सरकार तसेच केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांचा हप्ता धरुन एकून ५६ कोटी १५ लाखाचा पिक विमा भरण्यात गेला होता.  तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा परतावचे पैसे जमा झाले आहेत.

Crop loan : ३ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना बिन व्याज कर्ज मिळणार

पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत इफ्को टोकीयो जनरल या कंपनीकडुन गहू, रब्बी, ज्वारी, हरभरा या पिकांना २०२१ ते २०२२ मध्ये रब्बी हंगाम या पिकांनसाठी विमा राबवण्यात आला होता. जवळपास हि योजना वरील १६ तालुक्यात राबवण्यात आली होती. या १६ तालुक्यातून ७६ हजार ५०७ शेतकऱ्यांचे अर्ज होते तसेच यामध्ये १९१ कोटी ५ लाखाचा विमा निर्धारित करण्यात आला. या योजने अंतर्गत दोन कोटी पेक्षा जास्त‍ विमा हप्ता भरला तसेच ५५ हजार ३६९ हेक्टर विमा अंतर्गत संरक्षित करण्यात आले आहे.

Loan Forgiveness : शेतकऱ्यांचे झाले “सरसकट कर्ज माफ” ! राज्य सरकारचा मोठा निर्णय

१६ तालुक्यातून ४६ हजार १५९ शेतकऱ्यांना तसेच ३४ हजार ३५८ हेक्टरवरील नुकसान भरपाई १८ कोटी ७८ लाख ९६ हजाराचा विमा परतावा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे. गहूसाठी १ कोटी १३ लाख, हरभरासाठी १५ कोटी ८२ लाख, रब्बी ज्वारी १ कोटी ८३ लाख, एकून १८ कोटी ७८ लाख या पिकांना इतका पिक विमा मिळाला होता.

Tur : तुरीला असणार तूफान भाव जाणून घ्या कारणे !

Leave a Comment