महाराष्ट्रातील या भागात मुसळधार पाऊस होणार | Weather Updates | Havaman Andaj Today

Weather Updates : गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पुन्हा एकदा महाराष्ट्राला हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.


Weather Updates
Weather Updates


भारतातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस तसेच गारपीट होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार महाराष्ट्रात वातावरणात बदल झाल्यामुळे डोंगरीभागात गारपीट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील इतर भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो.

 

४ मार्च पासून महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस तसेच गारपीठ झाल्याने गहू, ज्वारी, हरभरा तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी यासाठी अनेक पाऊल उचलत आहे. महाराष्ट्र सरकार नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किती निधी मिळाला या बाबत खाली वाचा.

 

भारतीय हवामान माहितीनुसार, गोवा कोकण भागात उष्णतेची लाट येऊ शकते. कर्नाटक भागात सुध्दा उष्णतेच्या लाटीचा परिणाम होणार आहे. पुढे चालून महाराष्ट्रात उष्णतेचे प्रमाण हे वाढतच राहणार आहे.

 

मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्र या दोन भागात गारपीठ आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने अंदाज सांगितला आहे. अनेक परिसरात वादळे वाऱ्यासह गारपीठ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी.

Leave a Comment