Panjab Dakh Live : पंजाब डख १९ मे रोजी मान्सून बाबत शेतकऱ्यांना माहिती दिली आहे. सर्वात महत्वाचे की, राज्यात लवकरच मान्सूनची हजेरी लागणार असून शेतकऱ्यांनी तयारी करुन ठेवावी. १९ मे रोजी पासून राज्यात २१ मे पर्यंत अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहयला मिळणार आहे.
१० ते १२ दिवसात पावसाची सुरुवात होणार शेतकऱ्यांनी शेतातील कामे आटपून घ्यावे. २१ मे आणि २२ मे रोजी अंदमान निकोबार मध्ये मान्सूनचे आगमन होणार असून त्यानंतर २६ मे आणि २७ मे रोजी मान्सून खुप प्रगतीच्या मार्गवर असणार आहे.
शेतकरी मित्रांनो, २१ मे २२ मे २३ मे २४ मे पर्यंत मान्सून पूर्व भाग बदलत महाराष्ट्रात पावसाची हजेरी असणार आहे. पुढील तीन दिवस म्हणजे ३१ मे ते ३ जून पर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडणार असून शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. ८ जून पासून राज्यात मान्सूनची सुरुवात होईल असा अंदाज पंजाब डख यांनी सांगितला आहे.