Namo Shetkari Samman Nidhi Yojana : पीएम किसान योजनअंतर्गत आता पर्यंत १३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्या १४ हप्ता येणार असे सांगण्यात येत आहे. पीएम किसानचे हप्ते आल्यानंतर नमो शेतकरी योजनेअंतर्गत ७१ लाख शेतकऱ्यांना पहिला हप्ता खात्यात जमा होणार आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्यातील ३१ तारखेच्या आत पीएम किसान हप्ता येईल, त्यानंतर नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात जमा होण्यास सुरुवात होईल असे सांगण्यात येत आहे.
Namo Shetkari Samman Nidhi Yojana
नमो शेतकरी योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळवण्यासाठी पुढील तीन अटी पुर्ण करावे लागणार आहे. महत्वाचे म्हणजे प्रथम पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी असाल तर तुम्ही आताच ई केवायसी पूर्ण करावी. तसेच बँक खात्याशी आधार नंबर आणि फोन लिंक करावे, तसेच फोन नंबर आधारशी लिंक करावे. यामुळे तुमच्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत पैसे जमा झाल्यावर मेसेज फोन वर मिळेल.
शेतकरी असाल तर आताच आपला बळीराजा WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.