Cotton Rate : महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण कापसाच्या दरात घसरण पाहयला मिळत आहे. गेल्या पाच महिन्यापासून शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. कापसाचे भाव वाढतील या आशाने शेतकऱ्यांनी कापूस रोखून ठेवला होता. परंतू चार महिन्यापासून कापसाच्या भावात सुधारणा पाहयला मिळत नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे.
Namo Shetkari Samman Nidhi Yojana : नमो शेतकरी योजनेअंतर्गत 71 लाख शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळणार
शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला यावर्षी कवडी मोल भाव मिळत आहे. मागील वर्षी कापसाला तूफान भाव मिळाला पण यावर्षी सुध्दा कापसाला बऱ्यापैकी भाव मिळेल या आशाने शेतकऱ्यांनी कापूस रोखून ठेवला आहे. नोव्हेंबर महिन्यात कापसाला बऱ्यापैकी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये आशा निर्माण झाली होती. पण नोव्हेंबर महिना संपल्या नंतर कापसाच्या भावात घसरण होण्याची सुरुवात झाली होती. यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांना मध्ये खळबळ उडाली आहे.
आता खरीप हंगाम जवळ येतोय तरीही कापसाच्या भावात सुधारणा झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांन मध्ये वारंवार या विषयी चर्चा सुरु झाली आहे. खरीप हंगाम साठी शेतकऱ्यांना खर्च लागणार असल्यामुळे शेतकरी आता रोखून ठेवलेला कापूस विक्रीस काढत आहे. पण यावर्षी सध्याच्या परिस्थितीत सर्वात निच्चांकी दर कापसाला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी निर्माण होत आहे. नोव्हेंबर मधील कापसाचा दर आणि या महिन्यातील कापसाच्या दराची तुलना केली तर २ हजार किंवा २ हजार ५०० पर्यंत कापसाचे दर हे कमी झालेले आपणास पाहयला मिळतील.
शेतकरी असाल तर आताच आमच्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात