Farming Insurance : नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना तातडीने मदत करु असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते परंतू असे झाले नाही. प्रशासनाने पंचनामे करुन ४०० कोटी पर्यंत शेतकऱ्यांनसाठी अनुदानाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. तर राज्य सरकारने तातडीने शासन निर्णय काढून ४१० कोटी पर्यंत नुकसान भरपाई ३ लाख ८७ हजार शेतकऱ्यांनसाठी मंजूर केली होती.
Farming Insurance | बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान वाटप
शासन निर्णय मंजूर होऊन, तब्बल तीन महिने उलटून हि शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा झाली नाही. आता पर्यंत फक्त सव्वा दोनशे कोटी ( 225 कोटी ) रुपये २ लाख १२ हजार शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम हि जमा करण्यात आली आहे. तसेच उर्वरित रक्कम पावणे दोन लाख शेतकऱ्यांच्या अजून जाम झाली नाही. मिळालेल्या माहिती नुसार या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच अनुदानाची रक्कम पुढील आठवड्यात जमा करण्यात येईल असे आश्वासन मिळाले आहे.
अशा प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group सामील होऊ शकतात.