Cotton Crop Damage : सलग काही दिवसापासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. सतत पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्या देखता कापसाच्या वाती निर्माण होत आहे. कापसाची वेचणी करायची आहे पण पावसामुळे कापसाची वेचणी करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्याहातात आलेल्या कापूस वाया जातो काय अशी चिंता शेतकऱ्यांन मध्ये सुरु झाली आहे.
खंडग्रास सूर्यग्रहण ( solar eclipse ) : काळात काय करावे काय करु नये
महाराष्ट्रात ४५ लाख हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अहमदनगर मध्ये कापसाचे पिक चांगले आले आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिंसेबर महिन्यापर्यंत कापसाची संपूर्ण वेचणी होण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षा पासून पावसामुळे कापसाचे नुकसान होत असल्यामुळे कापसाच्या उत्पादनावर सुध्दा परिणाम होत आहे.
यावर्षी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने सोयाबीन आणि कापसाच्या मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अहमदनगर मध्ये सर्वात जास्त कापसाचे क्षेत्र शेवगाव, नेवासा आणि पाथर्डी या तालुक्यात आहे.
या महिन्यात खाजगी बाजार पेठेत किंवा व्यापाऱ्यांकडे कापसाला ६००० ते ७००० असा भाव देण्यात आलेल आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पावसामुळे कापूस खराब झालेला असून तो आता बाजार पेठेत येत आहे. कापसाला किती भाव मिळेल पण हे सांगणे कठीण जरी असले तरी सुध्दा आपण मागील वर्षानुसार तुम्ही अंदाज लाऊ शकतात. यावर्षी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली असली तरी सुध्दा यावर्षी कापसाला तूफान भाव येण्याची शक्यता आहे. कारण पावसामुळे आणि बोंड आळीचा प्रादभार्व तसेच अवेळी पाऊस झालेला असल्यामुळे कापसाचे बरेच नुकसान झालेले चित्र समोर येत आहे. २०२०ते २०२१ मध्ये कापसाला भाव डिंसेबर महिन्यात वाढण्याची सुरुवात झाली होती. याही वर्षी मागील वर्षाप्रमाणे कापसाला भाव भेटेल अशी अशा शेतकऱ्यांची आहे. जाणकारांच्या मतेनुसार यावर्षी नोव्हेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.