Lumpy : महाराष्ट्रात ७० टक्के गोवंशीय लसीकरण पूर्ण करण्यात यश मिळाले आहे. लसीकरणचा आकड हा एक कोटी पेक्षा जास्त असू शकतो त्यामुळे महाराष्ट्रात लम्पी रोगाचा प्रादभार्व कमी झालेला आहे. जनावरांनच्या मृत्यूचा आकड कमी सुध्दा झालेला आहे अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह दिली आहे.
पंधरा ते दहा दिवसांच्या माहमारीच्य अतिंम टप्प्यावर असल्याच सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितल आहे. महाराष्ट्रात १२०० पेक्षा जास्त जनावरांचा आतापर्यंत जीव गमवाला लागला आहे. तसेच ३५ ते ४० हजार जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली आहे. तसेच ३५ हजार जनावरांना पैकी १६ हजार जनावरांना पूर्णपणे बरे केले आहे.
Lumpy skin disease : देशात येणार या रोगामुळे दुधाचा तुटवडा
जिल्हानिहाय जनावरांचा मृत्यू
यवतमाळ = 2
जळगाव = 191
बीड = 3
अहमदनगर = 123
सातारा = 91
सोलापूर = 12
नांदेड = 10
कोल्हापूर = 77
नाशिक = 4
सांगली = 15
बहूतांश जनावरांवर लम्पी रोगाचे लक्षणे दिसल्यानंतर वेळेवर जनावरांनवर योग्य उपचार करण्यात आले आहे. म्हणून जनावरांच्या मृत्यूचा आकड कमी आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत ७० टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण केले आहे. महाराष्ट्रातील ३१ जिल्हात लम्पी रोगांचा प्रादभार्व पाहयला मिळला आहे. तसेच ३१ जिल्हात २०२३ गावात लम्पी रोगाचा शिरकाव झाला आहे. २०२३ गावात ३५ हजार पेक्षा जास्त जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली आहे. ३५ हजार पैकी १६ हजार जनावरांना बरे करण्यात यश मिळाले आहे.
गाई आणि बैलाना मोठ्या प्रमाणात लम्पी रोगाची लागण झालेले आढळत आहे. पण त्यापासून मानवी जीवनाला कसलाही प्रकारचा धोक आढळलेला नाही. शेतकरी मित्रांनो आपल्या जनावरांना लम्पी रोगाची लागण होऊ द्यायची नसेल तर तुम्ही प्रथम जनावरांनचा गोठा साफ ठेवा तसेच गोठ्यात डास किंवा इतर किंडे असतील तर तुम्ही कीटनाशक फवारणी करणे गरजेचे आहे.